accident viral video: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. इंटरनेटवर रस्ते, ट्रेन आणि विवाह अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. रस्त्यावर, डोंगरावर फिरायला गेल्यावर अशा विविध ठिकाणी अपघात होत असतात. अशा घटनांचे व्हिडीओदेखील अनेकवेळा सोशल मीडियावर फिरत असतात. अनेक धक्कादायक, अंगावर काटा आणणारे हे अपघात असतात. याच अपघातानंतर आपण रुग्णवाहिकेला फोन करुन बोलावतो, मात्र समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रुग्णवाहीकेनेच दुचाकीस्वाराला उडवल्याची घटना घडलीय. या व्हिडीओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे.

भीषण अपघातात आजोबा अन् नातवाला चिरडलं

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका क्षणात होत्याच नव्हतं झालं आहे. तमिळनाडूमध्ये सालेम जिल्ह्यात खरेदी नंतर दुकानाजवळील दुचाकीवरून जाणार्‍यासाठी उभ्या असलेल्या आजोबा-नातवाला एका खाजगी रूग्णवाहिकेने उडवल्याची घटना घडली आहे. ६० वर्षीय सेवानिवृत्त सरकारी वाहतूक कर्मचारी मुरुगन हे दैनंदिन गरजेच्या वस्तू घेण्यासाठी स्थानिक किराणा दुकानात गेले होते. यावेळी नातू मोनिझ त्याच्यासोबत होता.यावेळी अंगावर शहारा आणणारा हा अपघात झालाय. .

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – गौतमी पाटीलनं भर कार्यक्रमात फॅनला स्टेजवरच केलं kiss, व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान नागरिकांनी या रुग्णवाहिका चालकाला पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. तर जखमी आजोबा आणि नातवावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.