Viral Video American Woman Shares Heartwarming Journey : आज १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारताचा स्वातंत्र्यदिन आहे. झेंडा फडकवून आणि राष्ट्रगीत म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. जितकं आपण देशावर प्रेम करतो तसेच भारतातील संस्कृती, वेशभूषा, पाककला, येथील गाणी, गाण्यांमधील स्टेप्स आणि चित्रपट अनेकदा परदेशातल्या लोकांनाही आवडतात. अनेकदा त्यांनी भारतीय स्टाईलमध्ये केलेल्या काही गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रीलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतात. पण, आज एका महिलेच तिचं भारत देशावरील प्रेम तिला आयुष्याच्या एका वेगळ्या वाटेवर घेऊन गेलं आहे.
एका अमेरिकन महिलेने भारतात चार वर्ष राहून हिंदी शिकण्यापासून ते अगदी व्यवसाय सुरू करण्यापासून ते मुलाला दत्तक घेण्यापर्यंत तिचा प्रवास व्हिडीओत शेअर केला आहे. कंटेंट क्रिएटर क्रिस्टन फिशर असे या महिलेचे नाव आहे. क्रिस्टन मूळची अमेरिकेची आहे. आठ वर्षांपूर्वी तिने नवऱ्याबरोबर पहिल्यांदा भारताला आली होती आणि इथेच ती भारत देशाच्या प्रेमात पडली. ती भारतात फक्त तीन महिने राहिली आणि या सहलीने तिचे आयुष्य कायमचे बदलून टाकले.
त्यांनतर ती भारतातून पुन्हा तिच्या घरी अमेरिकेत गेली. तिला दोन मुली झाल्या. पण, कुठंतरी भारतात परत जाण्याची इच्छा तिच्या मनातून जातच नव्हती. मग अखेर, तिच्याकुटुंबाने कायमचे भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना त्यांना भीतीही वाटली. पण, आतून सर्व काही ठीक होईल अशी एक आशा सुद्धा मनात होती. नवीन देशात जुळवून घेणे आव्हानांशिवाय कमी नव्हते. तिला भाषा, जेवण बनवणे शिकावे आणि येथील सांस्कृतिक बारकावे समजून घ्यावे लागले.
व्हिडीओ नक्की बघा…
तू अनेकांसाठी प्रेरणा आहेस (Viral Video)
काही दिवसांनी तिने इथे मित्र सुद्धा बनवले, स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि दिल्लीत त्यांच्या तिसऱ्या मुलीचे स्वागतही केले. तसेच त्यांच्या कुटुंबाची नेहमी इच्छा असायची की, त्यांनी एका गरजू मुलाला दत्तक घेऊन त्याची मदत करावी. मग दोन वर्षांच्या भारतीय मुलीला त्यांनी दत्तक घेतले. तिला पहिल्यांदाच चालण्यास मदत करण्यासाठी उपचार आणि शस्त्रक्रियांची व्यवस्था केली ; अशी तिची खास गोष्ट तिने या व्हिडीओत सांगितली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ महिलेच्या @kristenfischer3 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “भारतातील आयुष्याची छोटीशी झलक” ; अशी कॅप्शन तिने व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून “आज मी पाहिलेली ही सर्वात सुंदर गोष्ट आहे”, “तू अनेकांसाठी प्रेरणा आहेस”, “तुमच्या कथेने माझ्या डोळ्यात पाणी आणले”, “भारतीय असल्याचा अभिमान आहे, तुम्हाला तुमच्या देशापेक्षा भारतावर जास्त प्रेम आहे” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत,