सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी बरेच जण गार्डन किंवा प्राणीसंग्रहालयाला भेट देतात. प्राणीसंग्रहालयाला भेट देताना अनेक जण आपल्या कुटुंबीयांना सोबत घेऊन जातात. अशावेळी जर तुमच्या सोबतीला तुमची लहान मुले असतील तर त्यांना प्राण्यांपासून दूर ठेवा.काही प्राणी इतके चपळ असतात की, खेळता-खेळता कधी त्यांना राग येईल हे कुणीचं सांगू शकत नाही. विशेष म्हणजे काही प्राणी पिंजऱ्यात असल्यानंतर अधिक हिंसक असतात. तिथं त्यांच्याशी पंगा घेणं अनेकांना महागात पडतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
माकडाशी पंगा घेणं तरुणीच्या अंगलट
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता प्राणी संग्रहालयात एक मुलगी माकडाला खाऊ द्यायला हात पुढे करते. त्यावेळी माकड तिच्या हातातील खाऊ तर खेचतोच त्यासोबतच त्या माकडाने थेट मुलीच्या केसांना हात घातला आणि जोरजोरात केस ओढू लागला. यादरम्यान माकडाच्या तावडीतून मुलीची सुटका करून घेताना सगळ्यांच्याच नाकीनाऊ आले. मुलीने तिथं बंदिस्त असलेल्या माकडाला त्रास दिला, त्यानंतर ते माकड मुलीला कशा पद्धतीने धडा शिकवतं हे सुध्दा पाहायला मिळालं आहे. बराच वेळ ही प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू असते. मात्र बरेच जण माकड चाळ्यापुढे अक्षरशः गुडघे टेकतात, काहीजण प्रयत्नांमध्ये हार मानून माकडापुढे हात जोडतात.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Video viral: बर्फात नऊवारी नेसून महिलेचा अनोखा स्टंट; नेटकरीही झाले चकित
माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियात खूप व्हायरल झाला असून व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आले आहेत. काही गोष्टी माकडांच्या विरोधात झाल्या तर ते किती हिंसक होतात हे या व्हिडीओमधून पाहायला मिळतंय