देशातील प्राण्यांना सुरक्षित निवासस्थान देण्यासाठी राज्यांमध्ये राष्ट्रीय उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे. अशा ठिकाणी माणसांची हालचाल पाहून प्राण्यांच्या हल्ल्याच्या बातम्याही समोर येत असतात. अलीकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे, ज्यामध्ये आसामच्या मानस नॅशनल पार्कमध्ये एक मोठा गेंडा टुरिस्ट व्हॅनचा पाठलाग करताना दिसत आहे.

नक्की काय झालं?

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक गेंडा रागात दिसत आहे. जंगलातल्या माणसांच्या हालचालींवर तो प्रचंड संतापलेला दिसतो. त्यामुळे तो टुरिस्ट व्हॅनवर हल्ला करण्याच्या उद्देशाने त्याच्यामागे धावताना दिसत आहे.

(हे ही वाचा: कृतज्ञता! रस्ता ओलांडण्यासाठी गाडी थांबवणाऱ्याचे हत्तीने अनोख्या पद्धतीने मानले आभार; Video Viral)

सध्या हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये गेंडा गाडीच्या मागे धावताना तसेच अनेक लोकांवर ओरडतानाही ऐकू येत आहे. माहितीनुसार, ही घटना २२ डिसेंबरची आहे. आसाममधील मानस नॅशनल पार्कच्या बहबरी रेंजमध्ये हा प्रकार घडला आहे.

(हे ही वाचा: पिंजऱ्याचे गेट उघडताच सिंहाने केअरटेकरवर मारली उडी अन्… बघा Viral Video)

(हे ही वाचा: किक मारल्यावर सुरु होते जीप, या हटके प्रयोगाने आनंद महिंद्रांचेही लक्ष वेधलं; बघा Viral Video)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंटरनेटवर समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये एक गेंडा उद्यानाची तोडफोड करताना दिसत आहे. आसामच्या स्थानिक वृत्तवाहिनी नॉर्थईस्ट लाइव्हने दिलेल्या माहितीनुसार, वनरक्षकांच्या हस्तक्षेपानंतरच पर्यटक संतप्त गेंड्याच्या प्रकोपातून वाचले.