सोशल मिडियावर अनेकदा वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ आहे ३४ वर्षीय अंजलि व्यास या महिलेचा. डान्स दिवाने या डान्स रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या पर्वामध्ये अंजलि यांनी दिलेल्या ऑडिशनचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जून २०१९ चा असला तरी आता तो इंटरनेटवर पुन्हा व्हायरल झाला असून अनेकांनी अंजलि यांचे कौतुक केलं आहे.

सामान्यपणे डान्स म्हटल्यावर लवचिकता, वेगवान हलचाली आणि आश्चर्यचकित करुन टाकणाऱ्या डान्स स्टेप असं मानलं जातं. मात्र हा गैसमज अंजलि यांनी आपल्या डान्सच्या प्रेमातून दूर केला आहे. अभिनेत्री आणि उत्तम डान्सर असलेल्या माधुरी दिक्षितसमोर अंजलि यांनी  ‘तेरी बॅण्ड जो बजी’ या ‘कॉक्टेल’ चित्रपटातील गाण्यावर अगदी मनसोक्तपणे डान्स केला. स्थूलपणाच्या समस्येला तोंड देणाऱ्या अंजिल यांच्यातील उत्साह आणि त्यांचा डान्स पाहून परिक्षकही स्टेजवर येऊन नाचू लागले. परिक्षकांनी तुम्ही वय, वजन यासारख्या गोष्टी डान्स करण्याच्या आड येऊ शकतात हा गैरसमज दूर केल्याचं सांगत अंजिल यांचे कौतुक केलं. अंजिल यांच्या ऑडिशनचा हाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून त्याला सव्वा दोन लाखांहून अधिक हिट्स मिळालेत. तुम्हीच पाहा हा व्हिडिओ…

कोण आहेत अंजलि?

अंजलि या राजस्थानमधील जोधपूरमध्ये असणाऱ्या न्यू मॉर्डन स्कूल (हिंदी माध्यम) या शाळेत शिक्षिका आहेत. त्यांना लहानपणापासून डान्सची प्रचंड आवड आहे. त्यांना स्थूलपणाची समस्या असली तरी त्यांनी आपली डान्सची आवड सोडलेली नाही. मागील वर्षी प्रजासत्ताकदिनानिमित्त अंजलि यांनी शाळेमध्ये डान्स केला होता. या डान्सचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी त्यांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. ‘आँख मारे ओ लडकी..’ या गाण्यावर अंजलि नाचल्या होत्या. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांचे कौतुक केलं होतं. अंजिला यांना डान्सची आवड असल्याने घरच्यांचाही त्यांना पाठिंबा आहे.