Viral Video: इंडिगो कंपनीच्या विमानात प्रवासादरम्यानच्या अनेक मजेशीर, तर वादग्रस्त घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये दिव्यांग महिलेला विमानातून उतरण्यासाठी व्हीलचेअर न देणे, प्रवासी बसणारी सीट तुटलेली असणे, हेडरेस्ट कव्हर मास्क म्हणून चेहऱ्याला लावणे आदी अनेक गोष्टी तुम्ही आजवर पहिल्या असतील. पण, आज सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओत काहीतरी अनोखं पाहायला मिळालं आहे.

व्हायरल व्हिडीओ इंडिगो विमानातील आहे. येथे एका चित्रकाराने फ्लाइट अटेंडंटच्या हातात एक कागद दिला आहे. फ्लाइट अटेंडंट स्वतःची स्वाक्षरी करून हा पेपर कलाकाराकडे सोपवते. नंतर फक्त एका पेनाने आणि फ्लाइट अटेंडंटच्या स्वाक्षरीने चित्रकार एक आकर्षक चित्र रेखाटतो. चित्रकाराने स्वाक्षरीपासून कोणतं चित्र रेखाटलं एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.

हेही वाचा…शेफने केले सर्वांनाच थक्क! चक्क खऱ्या पेन्सिल, कटरसारखा बनविला केक; पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा:

स्पीड पेंटर रबिन बार असे या चित्रकाराचे नाव आहे. विमानात प्रवासादरम्यान या चित्रकाराने त्याची कलाकारी दाखवली आहे. फ्लाइट अटेंडंटच्या स्वाक्षरीच्या प्रत्येक अक्षरांना हा चित्रकार जिवंत रूप देऊन काही सेकंदात एका जोडप्याचे चित्तथरारक पोर्ट्रेट तयार करतो, हे पाहून फ्लाइट अटेंडंटसुद्धा थक्क व आनंदी होताना दिसून येते. पोर्ट्रेट तयार होताच फ्लाइट अटेंडंटला ते भेटवस्तू म्हणून देण्यात येते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चित्रकाराच्या @speedpainter_rabinbar या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओला ‘सिग्नेचर आर्ट’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून चित्रकाराच्या या कलेचं कौतुक, तर त्याच्या कौशल्याला दाद देताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.