Viral Video Today: सकाळपासूनच कामाच्या गडबडीत अडकलेल्या तुमच्या मनाला थोडं आनंदी करायचं आहे का? तुम्ही ते वाक्य ऐकलं असेलच, खूप वाचावं कारण ‘उद्या’ खूप महत्त्वाचा दिवस आहे, आणि आजच खूप नाचावं कारण उद्याचा दिवस कोणी बघितला आहे? कदाचित हेच सूत्र सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील काकूंनी खूप मनावर घेतलं आहे. घर- ऑफिस, नातेवाईक- मुलं, नवरा सगळ्या कटकटी बाजूला ठेवून या व्हरल व्हिडिओमधील महिला आपल्या आयुष्याची मज्जा घेताना दिसत आहे.

मजा म्हणजे प्रत्येक वेळी पार्लरमध्ये जाऊन खूप खर्च करून घालवायचा वेळ असं नाही, कधी कधी बेभान होऊन आपल्या आवडत्या गाण्यावर भन्नाट डान्स केला तरी शरीरातील सगळ्या नसा व ताण मुक्त झाला असे वाटते, हो ना? फेसबुकवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक महिला १९८२ च्या डिस्को डान्सर चित्रपटातील ‘याद आ रही है’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडीओवरील कमेंटनुसार ही क्लिप कोलकाता येथील असल्याचे समजत आहे.

तानिया मैत्रा नावाच्या युजरने फेसबुकवर शेअर केलेला हा 2 मिनिटांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. कोलकात्याच्या रस्त्यावर मिथुन चक्रवर्तीच्या आयकॉनिक गाण्यावर एक महिला मनापासून नाचताना दिसत आहे. ही महिला भररस्त्यात पूजा मंडपाच्या बाहेरच नाचत होती, तिच्या कमाल स्टेप्स पाहून आजूबाजूची मंडळीही थांबून तिचे व्हिडीओ काढत होती. पण कदाचित लोकांकडे लक्षच द्यायचे नाही असे ठरवून आलेली ही महिला आपल्याच ढंगात मग्न होऊन नाचत होती.

महिलेचा भन्नाट डान्स झाला व्हायरल

Gautami Patil Lavani: गौतमी पाटील लावणी करताना प्रेक्षकांनी काठ्या फेकून मारल्या अन तितक्यात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या व्हिडिओवर अनेकांनी खूप सकारत्मक कमेंट केल्या आहेत. जवळपास तीन लाखाहून अधिक व्ह्यूज असणाऱ्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या महिलेचा आनंद हा लहान बाळाइतकाच निरागस आहे असे म्हणत आपल्यालाही तिच्यासोबत डान्स स्टेप्स करायची इच्छा होत असल्याचे काहींनी म्हंटले आहे.