Auto Driver Jugaad Viral Video: पावसाळा म्हटलं की पाणी तुंबणं, रस्त्यांवर चिखल आणि प्रवासात होणारा त्रास ही नेहमीचीच गोष्ट. अशा वेळी प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी एखादा रिक्षेवाला वेगळा विचार करेल असं क्वचितच घडतं. पण, सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा एक व्हिडीओ मात्र याला अपवाद आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल – “अशा रिक्षावाल्यासाठी दोन-चार रुपये जास्त भाडं द्यायलाही हरकत नाही!”
पावसाळ्यात रस्त्यांवर साचलेलं पाणी, चिखल आणि प्रवासाचा त्रास… हे दृश्य प्रत्येक मुंबई-पुणेकराला रोजचं आहे. पण, या गोंधळात एका रिक्षावाल्यानं असं काही केलं की, पाहणाऱ्यांनी थक्क व्हावं. ग्राहकांचे पाय पाण्यात भिजू नयेत म्हणून त्यानं जो जुगाड लावला, तो पाहून तुम्हीही म्हणाल – “हे फक्त भारतातच शक्य आहे!”
हा व्हिडीओ नेमका कुठे शूट झालाय हे स्पष्ट नाही. मात्र, यातली कल्पकता मुंबई-पुण्यासारख्या शहरांत पावसाळ्यात नक्कीच उपयोगी ठरेल. व्हिडीओत दिसतं की, रस्त्यावर पाणी साचलेलं आहे. त्यातून वाट काढत एक रिक्षा येते. तेवढ्यात एक तरुण रिक्षात चढण्यासाठी पुढे येतो. पण, पाणी इतकं साचलेलं की त्याचे पाय भिजणे आणि चिखलाने माखणे शक्य होतं.
मात्र, इथेच रिक्षावाल्याचा हुशारीचा खेळ सुरू होतो. ग्राहकाचे पाय पाण्यात भिजू नयेत म्हणून तो लगेच रिक्षातून एक लोखंडी शिडी खाली सोडतो. प्रवासी त्या शिडीवर पाय ठेवत थेट रिक्षात येऊन बसतो. पाय स्वच्छ, रिक्षाही स्वच्छ दोघांचाही फायदा.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @SinghKinngSP या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत २ लाख २० हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. कमेंट्समध्ये लोकांनी रिक्षावाल्याला सलाम ठोकला आहे. कोणी म्हणतंय, “ही टेक्नोलॉजी भारताबाहेर जाऊच नये”, तर कोणी हसत-हसत थेट अमेरिकेलाच आव्हान दिलंय – “या जुगाडसमोर अमेरिकेचं AI पण फेल आहे!”
ही छोटीशी ट्रिक पाहून अनेकांनी मुंबई-पुण्याच्या रिक्षावाल्यांना हा फंडा वापरायला सांगितलाय. पावसाळ्यात रोज प्रवास करणाऱ्यांसाठी ही कल्पना खरंच वरदान ठरू शकते. काही लोकांना हा प्रकार गमतीशीर वाटेल, पण खरं तर हीच खरी स्थानिक पातळीवरील इनोव्हेशनची ताकद आहे, ज्यात महागड्या यंत्रांची गरज नाही, फक्त डोकं आणि थोडीशी कल्पकता पुरेशी असते.
येथे पाहा व्हिडीओ
अशा जुगाडामुळे प्रवाशांचा प्रवास सोपा होतो आणि रिक्षावाल्याचंही वाहन स्वच्छ राहतं. आता बघूया, हा “शिडी फंडा” मुंबई-पुण्यात कधी दिसतो ते…