Minor Girl Accident video : लहान मुलांची काळजी घेणे वाटते तितके सोपे नसते. त्यांच्याकडे खेळताना, जेवताना, अगदी बाहेर फिरायला जातानासुद्धा अगदी डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावे लागते. कारण- घरी असताना ती स्वतःवर कसलं तरी संकट ओढवून घेत असली तरी रस्त्यावरून जाताना ती कधी कोणा दुसऱ्या व्यक्तीमुळे संकटात सापडतील याबद्दल काहीच सांगता येत नाही. आज असाच एक धक्कादायक प्रसंग एका तीन वर्षांच्या चिमुकलीबरोबर घडला आहे; जे पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
freepressjournal ने दिलेल्या वृत्तानुसार व्हायरल व्हिडीओ तमिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील आहे. एका रिक्षाचालकानं एका तीन वर्षांच्या चिमुकलीला चिरडले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दृश्य कैद झालं आहे. शुक्रवार, ४ जुलै रोजी तमिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील चिन्ना कडाई स्ट्रीटवरील एका छोट्याशा गल्लीत ही घटना घडली आहे. रिक्षाचालक त्या अरुंद गल्लीतून त्याची रिक्षा घेऊन जात होता. तितक्यात एक तीन वर्षांची चिमुकली खेळत खेळत घराबाहेर धावत येते; पण रिक्षाचालकाला ती तीन वर्षांची चिमुकली दिसत नाही.
रिक्षाचं मागचं चाक गेलं मुलीच्या अंगावरून… (Viral Video)
रिक्षाचालक रिक्षा चालवण्यात मग्न असतो. रिक्षाचालकाला समोरून चिमुकली येतेय हे लक्षातच येत नाही. रिक्षा लहान मुलीला धडकते, ती खाली पडते आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून येत आहे की, रिक्षाचे मागचे चाक अलगद मुलीच्या अंगावरून जाताना दिसते आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांना हे पाहून धक्का बसतो. ते जोरजोरात ओरडतात आणि मदतीसाठी मुलीकडे धावतात. सगळ्यांचा गोंधळ बघून चालक रिक्षा थांबवतो आणि तोसुद्धा मुलीला मदत करण्यासाठी धावतो.
व्हिडीओ नक्की बघा…
या अपघातानंतर तीन वर्षांच्या मुलीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिच्या नातेवाइकांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. पोलिस अधिकाऱ्यांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे आणि अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज ते तपासत आहेत, असे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हे सीसीटीव्ही फुटेज @vani_mehrotra या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहे आणि कॅप्शनमध्ये या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे.