सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशा व्हिडिओंमधील लोकांचे भन्नाट जुगाड किंवा त्यांचे कौशल्य नेटकऱ्यांना थक्क करणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक रिक्षाचालक प्रवाशाला युरोपीय देशांची यादी ऐकवत आहे. नेमके काय घडले जाणून घ्या.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ राजीव क्रिष्णा या इन्स्टाग्राम युजरने शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये या व्हिडीओबाबत माहिती देण्यात आली आहे. या रिक्षाचालकाचे नाव रामदेव असून त्यांचे वय ६० वर्ष आहे. व्हिडीओच्या कॅप्शननुसार राजीव रामदेव यांच्या रिक्षातून प्रवास करत असताना ट्रॅफिकमध्ये अडकले, त्यांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी आणखी १ तास लागणार होता. या वेळेत राजीवला आलेला कंटाळा ओळखुन रामदेव यांनी त्याच्याबरोबर गप्पा मारायला सुरूवात केली. या गप्पांमध्ये रामदेव यांना माहित असलेली युरोपीय देशांची यादी ऐकवली, हे ऐकून तुम्हीही अवाक व्हाल, पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: Video: पेट्रोल भरण्यासाठी केलेली घाई पडली महागात; बाइकवरील नियंत्रण सुटले अन्…

व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा: ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामदेव यांनी राजीवला किती देश फिरला आहात असा प्रश्न विचारला, यावर राजीवने काही देशांची नाव सांगताच, हे देश माहित असल्याचे त्यांनी सांगितले. यावर राजीवला विश्वास बसला नाही. त्यानंतर रामदेव यांनी ४४ युरोपीय देशांची नाव माहित असल्याचे सांगितले, आणि सलग त्या देशांची नावंही सांगितली. इतकेच नाही तर त्यातील काही देशांच्या पंतप्रधानांची नावंही त्यांना माहित होती. यासह त्यांना महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांची , गुजरातमधील ३३ जिल्ह्यांची व उत्तर प्रदेशमधील ७५ जिल्ह्यांची नावंही तोंडपाठ आहेत. नेटकरीही या गोष्टीने अचंबित झाले असून, त्यांच्या स्मरणशक्तीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.