Viral Video Elephant Calf Returns Home : प्राणी असो किंवा माणूस प्रत्येक जण आईला घाबरतोच. मित्रांबरोबर फिरायला जाताना काय सांगू, घरी यायला उशीर होणार याचे फोनवर काय कारण देऊ, बाहेर खेळायला गेल्यावर उशीर झाल्यावर तर घरी जेवायला येणार नाही, असे सांगितल्यावर आई ओरडणार असे अनेक प्रश्न आईच्या भीतीने मनात येऊ लागतात. तर हे सगळं प्राण्यांच्याही बाबतीत घडत असेल का, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? तर हा व्हायरल व्हिडीओ त्यांचे उदाहरण घेऊन आला आहे…

एका हत्तीच्या पिल्लाचा आईकडे धावत येतानाच हृदयस्पर्शी व्हिडीओ सगळ्यांची मने जिंकत आहे. सेव्ह एलिफंट फाउंडेशनचे संस्थापक लेक चायलर्ट यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ आई आणि तिच्या पिल्लांमधील प्रेम, नातं आणि त्यांच्या सुंदर आयुष्याची झलक दाखवत आहेत. “हत्तीचे पिल्लू दुसऱ्या कळपाला भेटण्यासाठी शेतात गेलं. भटकता, भटकता त्याला इतकी मजा आली की, त्याला वेळेचा अंदाजच आला नाही. त्यामुळे त्याची आई काळजीत पडली होती. मग हत्तिणीने पिल्लाला हाक मारली. आईचा आवाज ऐकून, हत्तीचे पिल्लू धावत परत आले.

‘या’ गोंडस प्राण्यांना पाहिल्याने चेहऱ्यावर हसू येते (Viral Video )

हत्तीचे पिल्लू फक्त परतच नाही आले, तर मित्रांबरोबर खेळून उशिरा घरी आल्यावर आता आई ओरडणार हे लक्षात आल्यावर एखाद्या मुलाचा चेहरा जसा पडतो, तसाच हत्तिणीच्या पिल्लाचा चेहरा पडला आहे. हत्तीचे पिल्लू धावत येते आणि आपल्या आईपाशी गुपचूप जाऊन उभे राहते. जणू काही हत्तीचे पिल्लू ‘आई, मला माफ करा. मी परत आलो आहे घरी!’ असे नकळत म्हणताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघाच…

व्हिडीओ बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @lek_chailert या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये व्हिडीओचे थोडक्यात वर्णन करण्यात आले आहे. तसेच नेटकरी व्हिडीओ पाहून हत्तिणीच्या पिल्लाच्या प्रेमात पडले आहेत. “तुम्ही कोणत्याही मूडमध्ये असलात तरी या गोंडस प्राण्यांना पाहिल्याने चेहऱ्यावर हास्य येते”, “ज्या पद्धतीने हत्तिणीचे पिल्लू धावत आले आणि आईची माफी मागितली तो क्षण खरोखरच खूप गोंडस होता” आदी नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट्स दिसून आल्या आहेत.