Viral Video: पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू आहे. त्यामुळे पाऊस पडल्यावर आपले मन नकळत सुखावते. फक्त आपल्यालाच नाही, तर प्राण्यांदेखील पावसाळा खूप आवडतो. पावसाळ्यातील निसर्गाच्या सौंदर्याचे अनेक सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातून हिरवे डोंगर, धबधबे पाहायला मिळत आहेत. पण, आता असाच एक सुंदर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; ज्यामध्ये एक श्वान पावसाचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत असून, त्यावर युजर्सही अनेक मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर श्वानांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओंमध्ये एक श्वान मोबाईलमध्ये रील्स पाहताना दिसतो; तर कधी श्वान खेळताना दिसतो. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एका श्वानाने पावसात भिजण्यासाठी चक्क त्याच्या मालकिणीला चकवून पावसाचा आनंद लुटला होता. हा व्हिडीओदेखील तुफान व्हायरल झाला होता.
व्हिडीओमध्ये नक्की काय घडले?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक श्वान घराबाहेरच्या परिसरात पावसाचा आनंद घेत आहे. यावेळी तो मोठमोठ्याने उड्या मारत पाण्यात भिजताना दिसत आहे. श्वानाच्या या कृतीवरून त्याला पाऊस खूप आवडत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकरीदेखील पसंती व्यक्त करताना दिसत आहेत.
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dramebaazchhori99 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि दीड लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. तसेच त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी माझ्या आयुष्यात पाहिलेला सर्वांत आनंदी श्वान.” दुसऱ्यानं लिहिलेय, “सुंदर क्षण जगतोय.” तर, आणखी एकाने गमतीमध्ये लिहिलेय, “पाऊस आल्यावर काही मुलीपण असा डान्स करतात.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी श्वानाचा असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता; ज्यात तो निवांत बसून बाहेर पडत असलेल्या पावसाकडे कौतुकाने पाहत होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.