Ek Number Tujhi Kambar Dance Video : सोशल मीडियावर एखादे गाणे ट्रेंड झाले की, त्या गाण्यावर रील बनवण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. मग आपला रील सगळ्यात वेगळी कशी दिसेल याकडे सगळ्यांचा कल असतो. मग यासाठी कोण मजेशीर तर अगदी पारंपरिक ट्विस्ट देऊन हा ट्रेंड पूर्ण करत असतो. तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या स्टाईलमध्ये ‘एक नंबर तुम्ही कंबर’ गाण्यावर डान्स केलेला पाहिला असेल. पण, आज चक्क या गाण्यावर भरतनाट्यम स्टाईल डान्स केला आहे; जो पाहून तुम्ही थक्क होऊन जाल.
गुलाबी साडीनंतर संजू राठोडचं ‘एक नंबर तुझी कंबर’ हे गाणे बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालते आहे. या गाण्याला सगळ्यांनीच खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. तर आता नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शिका अनुराधा अय्यंगार यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये भरतनाट्यम ग्रुपमधील सहा महिलांनी एक अनोखा डान्स सादर केला आहे. ज्यामध्ये भरतनाट्यमचे उत्तम सादरीकरण आणि फ्रीस्टाइल डान्स स्टेप्सचे उत्तम मिश्रण सादर करण्यात आले आहे.
एक वेगळी कोरिओग्राफी पाहून आनंद झाला (Viral Video)
एक नंबर तुझी कंबर गाण्यावर भरतनाट्यम ग्रुपचा डान्स व्हायरल होताना दिसतो आहे. डान्स करताना त्यांचा आनंद, भरतनाट्यमची अनोखी जोड, शाहरुख खानची आयकॉनिक पोझ अगदी बघण्याजोगा आहे. पारंपरिक आणि वेस्टर्न डान्स स्टाईल अगदी व्यवस्थितपणे डान्समध्ये बसवल्या आहेत; जे पाहून नृत्यदिग्दर्शकाचे सुद्धा कौतुक होत आहे.तर ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्याला दिलेला भरतनाट्यमचा पारंपरिक टच एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्ही सुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
‘एक नंबर तुझी कंबर गाणे आमच्या स्टाईलमध्ये’ अशी कॅप्शन देऊन हा व्हिडीओ सोशल मीडियावर @anu_iyengar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून प्रेमात पडले आहेत आणि “सगळं खूप छान आहे. पण, अनु मॅडमने शाहरुख खानची पोज दिली हे सर्वात स्पेशल आहे”, “या गाण्यावर एक वेगळी कोरिओग्राफी पाहून आनंद झाला”, “खूप भारी”, “मी हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघितला” ; आदी कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.