scorecardresearch

…अन भाजप खासदार हाताने शौचालय घासू लागले; नेमकी का आली एवढी वेळ? पाहा Viral Video

BJP MP Cleans Toilet with Bare Hands Video: भाजप खासदार चक्क हाताने कोणतेही ग्लोव्ह्ज न घालता टॉयलेट साफ करताना दिसत आहेत.

…अन भाजप खासदार हाताने शौचालय घासू लागले; नेमकी का आली एवढी वेळ? पाहा Viral Video
BJP MP Cleans Toilet with Bare Hands Video (फोटो: ट्विटर)

BJP MP Cleans Toilet with Bare Hands Video: आमदार- खासदार मंडळी चर्चेत राहण्यासाठी अलीकडे सेलिब्रिटींपेक्षा जास्त उत्सुक असतात असं म्हणायला हरकत नाही. भाजपचे आमदार जनार्दन मिश्रा यांनीही आता असं काही केलंय की जे बघून त्यांचं कौतुक करावं की याची काय गरज होती असा प्रश्न करावा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मध्य प्रदेशाच्या रीवा मतदारसंघातून निवडून आलेले जनार्दन मिश्रा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात मिश्रा चक्क हाताने कोणतेही ग्लोव्ह्ज न घालता टॉयलेट साफ करताना दिसत आहेत.

मिश्रा यांनी अचानक टॉयलेट साफ का करायला घेतलं यामागचं कारण ऐकून नेटकऱ्यांना विश्वासच बसत नाही आहे. पण बरं का अशा प्रकारे टॉयलेट साफ करण्याची मिश्रा यांची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वी करोना काळातही मिश्रा यांनी कोविड केंद्रातील टॉयलेट घासून स्वच्छ केले होते, त्यावेळेस निदान त्यांनी ब्रश तरी वापरला होता पण यावेळेस मात्र ते चक्क हाताने टॉयलेट साफ करताना दिसत आहेत.

Video: विधानभवनात गाय घेऊन आले भाजप आमदार; भाषण देताना गायीनेच अशी फजिती केली की…

भाजप आमदारांचा आहे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यांनी स्वतः सुद्धा हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, ” पक्षाच्या सेवा सप्ताहाचा भाग होऊन युवक मोर्चा काढण्यात आला होता त्यात बालिका विद्यालयाच्या वृक्षारोपण कार्यक्रमात याच विद्यालयतील शौचालयाची स्वच्छता केली”

पाहा व्हिडीओ

भाजप आमदारांनी शौचालय स्वच्छ केले पण नेटकरी म्हणतात…

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी जनार्दन मिश्रा यांच्यावर टीका केली आहे. जर तुम्हाला एवढं स्वच्छतेचं भान होतं तर ब्रश वापरून नीट तरी काम करायचं ना! असा सल्लाही अनेकांनी दिला आहे. तर काही दिवसांच्या प्रसिद्धीसाठी काय काय कराल असेही प्रश्न अनेकांनी केले आहेत. काहींनी मिश्रा यांच्या व्हिडिओला नाटकी म्हणत काय गरज होती असे म्हंटले आहे. दुसरीकडे काही समर्थकांनी या व्हिडीओचे कौतुकही केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video bjp mp cleans toilet with bare hands know reasons who is janardan mishra svs

ताज्या बातम्या