Viral Video: खरं प्रेम ही एक खूप सुंदर आणि निर्मळ भावना आहे. ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असते, त्या व्यक्तीसाठी आपण काहीही करायला तयार असतो. पण, प्रेमात भांडणे, वादविवादही बऱ्याचदा पाहायला मिळतात. असे म्हणतात, जिथे जास्त प्रेम असते, तिथेच जास्त भांडणेदेखील होतात. मात्र, हल्ली भांडणातून निर्मळ व नि:स्वार्थी प्रेम फार क्वचितच पाहायला मिळते. याचदरम्यान, सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक व्यक्ती आपल्या प्रेयसीचा रुसवा दूर करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतेय.

नुकतेच मुंबईमध्ये मुसळधारेने थैमान घातले होते. त्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठले होते त्याशिवाय लोकल ट्रेनही रद्द करण्यात आल्या होत्या. परिणामस्वरूप शाळा, कॉलेज आणि कार्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आली होती. हा व्हिडीओदेखील याचदरम्यानचा आहे. यावेळी ट्रेनची वाट पाहण्यासाठी अनेक प्रवासी कर्जत स्थानकावर उभे आहेत. सर्वांचे लक्ष ट्रेन कधी येणार याकडे आहे. परंतु, त्याच स्थानकावर एका जोडप्यामध्ये भांडण सुरू असल्याचे दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कर्जत स्थानकावर एका जोडप्यामध्ये कोणत्यातरी कारणामुळे वाद झाल्याचे दिसत आहे. यावेळी प्रेयसी प्रियकरावर रुसली असून, तिचा रुसवा दूर करण्यासाठी प्रियकर तिच्यासमोर उभा राहून उठाबशा काढताना दिसतोय. त्यानंतर तो खाली बसतो आणि तिची माफी मागून, तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यातील हे भांडण पाहून स्थानकावरील अनेक जण त्यांच्याकडे कुतूहलाने पाहताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

सोशल मीडियावर खूप चर्चेत असलेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rits_love358 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला नऊ लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर विविध कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय, “चार लोग चालीस बाते, चारसों अफवाये; त्यामुळे काही फरक नाही पडत. त्याला त्याच प्रेम महत्त्वाचं आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “ते प्रेम आहे आणि तो तिला मनवण्यासाठी काहीही करू शकतो हे दिसून येतंय.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “एक वेळेस ट्रेन सुटली तरी चालेल; पण आपली आवडती व्यक्ती सुटली नाही पाहिजेल.”