Bride And Groom Ukhana Viral Video : लग्न, गृहप्रवेश किंवा एखादी पुजा असेल तर जोडप्यांकडून उखाणा म्हणून घेतले जातात. उखाणा म्हणजे नवरा-बायकोचं थेट नाव न घेता काव्यपंक्तींमध्ये गुंफून नाव घेणे होय. तसेच या दरम्यान आजूबाजूचा माहोलदेखील मनोरंजक होतो. पण, खासकरून महाराष्ट्रीयन लग्नपद्धतीत उखाण्यांना फार महत्त्व दिले जाते. त्यामुळे काही जण उखाणे बनवतात, काही अगदी पाठ करून ठेवतात, तर काही जण अगदी ऑन द स्पॉट यमक जुळवून सगळ्यांचे मन जिंकतात. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, व्हिडीओनुसार नवीन लग्न झालेलं जोडपं दारात उभं आहे. या जोडप्याला सगळेच जण नाव घेण्यासाठी सांगताना दिसत आहेत. तर नवरदेव अगदी हटके नाव घेतो आणि बायकोपासून ते घरातील सदस्यांनपर्यंत सगळ्यांनाच खुश करतो. तर नवरदेवाने ‘लोकांना होती आमच्या प्रेमावर शंका, लग्न करून आज वाजवला डंका, फिरायला जायचं का श्रीलंका, हे बघ आई तुझ्यासाठी सून आणलीय जिचं नाव आहे प्रियांका…’ ; असे नाव घेतले आहे .
एक अविस्मरणीय क्षण (Viral Video)
प्रेम, आदर आणि मजा-मस्ती करत आपल्या जोडीदाराचे नाव सगळ्यांसमोर घेणे म्हणजे स्वर्गसुख असते. याच उत्तम उदाहरण व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल, नवरदेव उखाण्याची एकेक ओळ बोलत असतो तेव्हा घरातील सगळीच मंडळी जोरजोरात ओरडून त्याला प्रोत्साहन देत असतात. पूर्ण उखाणा ऐकल्यानंतर बायको सुद्धा लाजते आणि ‘वाह्ह’ असे रिअॅक्शन देते आणि घरातील सगळीच मंडळी टाळ्या वाजवून नवरदेवाची कौतुक करतात. तुम्हीसुद्धा ऐका नवरदेवाचा भन्नाट उखाणा…
व्हिडीओ नक्की बघा…
लग्नाच्या दिवशी नवरा आणि नवरी दोन्हींना उखाण्यात आपल्या जोडीदाराचे नाव घ्यावे लागते. ही एक फार जुनी आणि मनोरंजक प्रथा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @pedaaa आणि @kori_ashutosh या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “गृहप्रवेश करतानाचा एक अविस्मरणीय क्षण”; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. तसेच व्हिडीओ नेटकऱ्यांना सुद्धा आवडला असून १ लाख ९७ हजार लाईक्स या व्हिडीओला आतापर्यंत मिळाले आहेत…