Viral Video Bride And Groom Marathi Ukhane : आपल्याकडे उखाण्याला खूप जास्त महत्त्व असतं. लग्नाकार्यात किंवा एखाद्या कार्यक्रमात आपल्याकडे उखाणा घेण्याची पद्धत आहे. पूजा असो किंवा गृहप्रवेश जोडप्यांना आवर्जून उखाणे घ्यायला सांगितले जाते. बरेच जण जुने, तेच-तेच उखाणे घेत असतात. पण, ज्यांच्याकडे टॅलेंट असते ते नव्याने उखाणे रचतात आणि त्यात आपल्या जोडीदाराचे नाव अगदी मजेशीर पद्धतीने जोडतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ असेच काहीतरी सांगतो आहे. एका जोडप्याने जबरदस्त उखाणा घेतलेला दिसत आहे.

पूर्वीच्या काळी मोठेच्या मोठे उखाणे घेण्याची पद्धत होती. आता मात्र आताच्या काळाशी निगडीत असे हटके उखाणे घेण्याला तरुणांकडून पसंती दिली जाते. काही जणांना प्रसंगानुरुप उखाणे तयार करण्याचे खास स्कील असते, तर व्हायरल व्हिडीओत सगळ्यात पहिला नवरा मुलगा “वन बॉटल, टू ग्लास, तेजश्री माझी फर्स्ट क्लास” असा उखाणा घेतो. तर नवरी मुलगी “छोट्यांची मी आत्या, मोठ्यांची मी ताई, सर्वांनाच झाली आहे माझ्या लग्नाची घाई, आई ती माझी सर्वांची माई. लग्न ठरवतेयं माझं लवकरच काही. नवरा मुलगा शोधलाय मी चिकना, नाव त्यांचं साई. लावा काकू कुंकू, लवकरच होणार मी भालेरावांची सुनबाई”; असा जबरदस्त उखाणा घेतला आहे.

सर्वांनाच झाली आहे माझ्या लग्नाची घाई… (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, नवरा आणि त्याच्या घरची मंडळी नवरीला बघायला आलेली असतात. बोलणी झाल्यानंतर लग्न ठरलेल्या जोडप्याला सगळे उखाणा घ्यायला सांगताना दिसतात. एकेक करून नवरा आणि नवरी उखाणा घेतात. पण, मुलगी नाव घेताना नवरा मुलगा गालात हसत, तिचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करताना दिसतो हे पाहून अनेक नेटकरी खूश झाले आहेत. एकदा बघाच सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @off_beat_cousins या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘ती दोष देण्यात नाही तर नाव घेण्यात माहिर आहे’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून नवरी मुलीच्या उखाण्याचे कौतुक, तर काही जण नवरा मुलगा आपल्या होणाऱ्या बायकोचा अगदी प्रेमाने व्हिडीओ काढतो आहे हे पाहून खूश होत आहेत आणि वेगवेगळ्या कमेंट्स व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.