Viral Video: लग्न करून सासरी जाणं प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सुंदर; पण तितकाच हळवा क्षण असतो. स्वतःच्या लग्नाची अनेक मुली आतुरतेने वाट पाहतात. पण, ती वेळ जसजशी जवळ येऊ लागते तसतसे मनात आई-वडिलांना सोडून जाण्याचे दुःख, भावंडांबरोबरच्या आठवणी, बालपण, अशा सर्व आठवणी एकामागून एक मनात दाटून येतात. आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेल्या लेकीचे जेव्हा कन्यादान केले जाते, तेव्हा तो क्षण तिच्याइतकाच कुटुंबासाठीही हृदयस्पर्शी असतो. सध्या एका लग्नातील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात; ज्यात कधी मनोरंजन करणारे, तर कधी आपल्या मनाला भावूक करणारे व्हिडीओ असतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एका लग्नात कन्यादान विधी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नमंडपात कन्यादान विधी सुरू आहे. त्या कन्यादान विधीला सुरुवात होताच वधू ढसाढसा रडायलाच लागते. यावेळी वर तिचे डोळे पुसून तिचा शांत होण्यास सांगतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील@mahi_beauty_studio_basmath या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला चार दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्सही यावर कमेंट्स करीत आहेत. एक नेटकऱ्याने लिहिलेय, “नवरा खूप छान भेटला आहे आणि तुझी किती काळजी आहे त्याला”. दुसऱ्या युजरने लिहिलेय, “मुलगी आई-वडिलांच्या काळजाचा तुकडा नाही; पूर्ण काळीज असतं.” आणखी एकाने लिहिलेय, “नवरा किती छान आहे बघ. तुला खूप फुलाप्रमाणे जपेल”.