Bus Driver Vs Woman Passenger Viral Video : जगातील महिला सुरक्षेचा प्रश्न हा सर्वत्र सारखाच आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महिलांना अनेक विशेष अधिकार दिलेले आहेत. पण, या अधिकारांचा नक्की कुठे आणि कसा वापर करायचा याबद्दलची काही महिलांना जाणीव नसते. तर आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये महिला प्रवासी भांडत करत बस चालकाला मारहाण करताना दिसली आहे.
प्रवासी आणि त्यांना सुखरूप पोहचवणारे चालक यांच्यावर प्रवाशांची जबाबदारी असते. त्यांना दररोज वेगवेगळ्या प्रकारचे प्रवासी प्रवासात भेटतात; काही चांगले असतात, तर काही अगदी विनाकारण भांडणारे असतात; त्यामुळे या सगळ्यात कधी कधी बस चालकांनाही स्वतःची सुरक्षा करण्यासाठी टोकाचे पाऊल उचलावेच लागते.
तर बंगळुरू तुमकुरु रोडवर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) बस चालक आणि महिला प्रवाशामध्ये हाणामारी झाली. बुधवारी दुपारी पेन्याजवळ महिला बसच्या प्रवेशद्वारावर ड्रायव्हरशी वाद घालताना दिसते आहे. बोलता बोलता नंतर महिला त्याच्या सीटच्या मागे जाऊन भांडते आणि त्याला मारहाण सुद्धा करते. मग काय ड्रायव्हरचा संताप होतो आणि त्याने सुद्धा महिलेला मारले. यामुळे प्रवाशांमुळे बस कर्मचाऱ्यांवर येणाऱ्या दबावाकडे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
लिंग काहीही असो, शारीरिक हल्ले टाळा (Viral Video)
बस चालक आणि महिला प्रवाशामध्ये कशावरून भांडण झाले अद्याप त्याचे कारण अस्पष्ट आहे. पण, सगळ्यात आधी महिलेने वाद घालायला सुरुवात केली. महिलेने जेव्हा जेव्हा ड्रायव्हरला मारले तेव्हा तेव्हा ड्रायव्हरने सुद्धा महिलेला मारले; ज्यामुळे इतर प्रवासी आश्चर्यचकित झाले. बस कंडक्टर मध्ये उभा होता त्यामुळे हे भांडण थोडक्यासाठी का होईना थांबले.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @karnatakaportf या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये घटना सविस्तर लिहिण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून काही जणांनी ड्रायव्हरची बाजू घेतली, तर अनेक जणांनी महिलेची बाजू घेतली आहे. तर एक युजर म्हणतोय “प्रवाशानेच प्रत्यक्षात मारहाण सुरू केली. तिला अटक करायला हवी” दुसऱ्याने लिहिले, “जर कंडक्टर मध्येच बचाव करत नसता तर ड्रायव्हरसाठी परिस्थिती खूप कठीण झाली असती’ , “परस्पर आदर असणे आवश्यक आहे”, “लिंग काहीही असो, शारीरिक हल्ले टाळले पाहिजेत”, “शाब्बास ड्रायव्हर काका. तिला धडा शिकवायला हवा” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत. या व्हिडीओला उत्तर देत अधिकृत एक्स अकाउंटवरून बंगळुरू शहर पोलिस खात्याने म्हटले आहे की, “आम्ही तुमची तक्रार संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे”