चिंपांझी हा अत्यंत बुद्धिमान प्राणी आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे. ते खूप लवकर जुळवून घेतात आणि मानवाचे अनुकरण करू शकतात. मानव आणि चिंपांझी त्यांच्या डीएनएच्या तब्बल ९८.८ टक्के भाग सेमच असतो असं म्हंटल जाते. त्यामुळे, चिंपांझीचे कपडे धुताना माणसाचे अनुकरण करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होईल यात शंका नाही. चिंपांझीला हुबेहूब माणसांप्रमाणे कपडे धुताना बघून नेटीझन्सने त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये चिंपांझी एका ओढ्याजवळ कपडे धुताना दिसतो. तो खाली बसून पिवळ्या रंगाचा टी-शर्ट देसी स्टाईलने धुताना दिसत आहे. त्याने प्रथम कापड ओले केले आणि नंतर नीट सरळ केले. त्यावर साबणही लावले आणि टी-शर्ट स्वच्छ करण्यासाठी घासले. हे करताना सर्व वेळ ओढ्यातील पाणीसुद्धा वापरले.

चिंपांझी स्पष्टपणे माणसाचे अनुकरण करत होते आणि तेही अगदी उत्तम प्रकारे करत होते. असे दिसते की जणू एखाद्या प्राण्याला कापडाचा तुकडा धुण्याच्या सर्व स्टेप्स माहीत आहेत. सचिन शर्मा या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओला ९५,००० हून अधिक व्ह्यूजसह व्हायरल झाला आहे. नेटिझन्सना आवडले की चिंपांझी अशा परिपूर्णतेने कपडे धुवू शकतात. त्यांनी इमोजीसह कमेंट केल्या आहेत.