सोशल मीडियावर कॉफी आणि चहाचे कट्टर प्रेमी त्यांचे पेय किती उत्तम आहेत हे रील किंवा मिम्सच्या मदतीने आवर्जून सांगताना दिसतात. सकाळी गरमागरम चहा तर संध्याकाळी किंवा मिटिंगसाठी कोल्ड कॉफीचा आस्वाद घेणारे आपल्यातील बरेच जण आहेत. कॉफी शॉप असो किंवा हॉटेल सहसा कॉफी ही कपमधून दिली जाते. पण, तुम्ही कधी आईस्क्रीम कोनमध्ये कॉफी देताना पाहिलं आहे का ? नाही, तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. येथे कपमधून नाही तर चक्क आईस्क्रीम कोनमध्ये कॉफी ग्राहकांना दिली जाते आहे.
व्हायरल व्हिडीओ चेन्नईचा आहे. सुरवातीला तुम्ही पाहू शकता की, एका स्टँडवर आईस्क्रीम कोन ठेवण्यात आला आहे. त्यानंतर चेन्नईच्या दुकानातील कर्मचारी जगमध्ये भरून ठेवलेली तयार कॉफी या आईस्क्रीम कोनमध्ये ओतताना दिसत आहे. आईस्क्रीम कोनमध्ये कॉफी ओतल्यानांतर कोन स्टँडमधून काढून ग्राहकांना दिला जातो आहे. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.
हेही वाचा…अद्भुत! शिक्षकाने ‘बॉय’ शब्दातून रेखाटले ‘असे’ सुंदर चित्र; VIDEO पाहून नेटकरी झाले थक्क
व्हिडीओ नक्की बघा :
आईस्क्रीम कोन आणि कॉफी यांचे अनोखे कॉम्बिनेशन या व्हिडीओत पाहायला मिळालं आहे ; जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. आईस्क्रीम कोनमध्ये ग्राहकांना दिली जाणारी या कॉफीची किंमत २५० रुपये आहे. तसेच ही अनोखी कॉफी ग्राहकांना चेन्नईच्या कोणत्या दुकानात मिळेल याचा पत्ता देखील व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @madrasfoodjournal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनु मुरुगन असे या युजरचे नाव आहे. तसेच या युजरचे युट्युबवर सुद्धा एक चॅनल आहे जिथे विविध फूडचे अनेक व्हिडीओ शेअर करण्यात आले आहे. तर हा व्हायरल व्हिडीओ पाहून काही कॉफी प्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत. तर काही कॉफी प्रेमींनी अनोख्या पद्धतीत कॉफी पिण्याची आवड सुद्धा व्यक्त केली आहे.
