Father Emotional Reaction Viral Video : इवलेसे हात पकडून चालायला शिकवणाऱ्या लेकीचे कन्यादान करून सासरी पाठवण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा बाबांचा जीव आणखीन जास्त काळजी करायला लागतो. माहेरच्या लोकांप्रमाणेच आपल्या मुलीला आनंदी ठेवणारा नवरा आणि सासर मिळावं, अशी वडिलांची इच्छा असते. लेकीला फ्रॉक, ड्रेसमध्ये बघणारे बाबा लग्न ठरल्यावर तिला दागिने, साडी, लेहेंगामध्ये बघून कसे रिॲक्शन देतील हे दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे…

व्हायरल व्हिडीओत बाबा, आई, भाऊ सोफ्यावर बसलेले असतात. आईच्या लग्नातील लूक लेकीने रिक्रिएट केलेला दिसतो आहे; तर लेक जेव्हा अगदी हुबेहूब आईसारखा लेहेंगा घालून सगळ्यांना दाखवायला बाहेर येते, तेव्हा भाऊ आणि आई खूप जबरदस्त रिॲक्शन देतात. मात्र, बाबा आपल्या लाडक्या लेकीकडे एकटक बघत राहतात. एवढेच नाही तर त्यांना स्वतःच्या लग्नातले काही क्षण आठवतात, जे व्हिडीओतही दाखवण्यात आले आहेत; जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, लेकीला लेहेंगामध्ये पाहून बाबांच्या डोळ्याची पापणी फडफडतसुद्धा नाही, ते एकटक आपल्या लाडक्या लेकीकडे बघत राहतात; हे पाहून भाऊ आणि आई बाबांकडे बघायला लागतात. होणाऱ्या नवरीचा भाऊ आईचा लग्नातील फोटो बहिणीच्या चेहऱ्यासमोर ठेवतो आणि अगदी हुबेहूब दिसतेय असे अगदी हसून म्हणतो. सोशल मीडियावर बाबा आणि लेकीचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजकाल लग्नात आईच्या लग्नातील साडीला मॉडिफाय करून किंवा आईच्या लग्नातील लूक रिक्रिएट करून मुली त्यांच्या लग्नात खास तयार होतात. तर आईच्या लग्नातील लूक आज या व्हायरल व्हिडीओतील लेकीने रिक्रिएट केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @cricket_prediction_universe आणि @wildsutraa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘जेव्हा बाबा लेकीला लेहेंगामध्ये बघतात आणि एकटक बघत राहतात’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा इमोजीसह त्यांच्या भावना व्यक्त करताना कमेंटमध्ये दिसत आहेत.