Daughter Surprising Her Mother With Special Birthday Cake : मालिका आणि आई यांचे नाते काहीतरी वेगळंच आहे. टीव्हीमध्ये दररोज ठराविक वेळेत लागणाऱ्या मालिका आईच्या अगदी जवळच्या असतात. जेवण बनवताना, दुपारी घरी एकटं असताना या मालिका तिच्या जणू काही मैत्रिणी असतात. मालिकेत एखाद्याचे चांगले झाले तर आईच्या चेहऱ्यावर हसू तर एखादा रडला तर आईच्या डोळ्यात अश्रू ; असे काहीसे नाते मालिकांचे आईबरोबर असते. तर आज हेच लक्षात घेऊन एका लेकीने आपल्या आईसाठी खास केक आणला आहे.
व्हायरल व्हिडीओत @thombarejyoti2408 या युजरच्या आईचा वाढिवस असतो. चाळीतली अनेक मंडळी वाढदिवसासाठी जमली आहेत. त्यानंतर लेक आईसाठी खास केक घेऊन येते. केकचा बॉक्स उघडताच अनेक मालिकांची नावे आणि त्यांचे पोस्टर त्या केकवर लावलेले दिसत आहेत. त्यामुळे केकचा बॉक्स उघडताचा आई केक बघायला जवळ जाते आणि डोकावून घेते. आई केकवर तिच्या आवडत्या मालिका पाहून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो; जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर आनंद येईल.
ते हसू नव्हतं तर तो एक आनंद होता… (Viral Video)
सोशल मीडियावर हा क्षण व्हिडीओद्वारे @thombarejyoti2408 आणि @jeeteshthombare या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करून लेकीने म्हंटले की, “आईचा वाढदिवस… त्या क्षणाशिवाय दुसरा सुंदर क्षण नाही. जेव्हा आपली आई मनापासून हसते… तिच्या आवडत्या मालिका असं अचानकपणे तिच्या वाढदिवसाच्या केकवर पाहून ती खुश झाली. अशा खूप कमी गोष्टी आहेत; ज्या तिला खुश करतात आणि त्यातली एक तिची आवड म्हणजे या मालिका बघणं… म्हणूनच तिच्यासाठी हा खास केक आणला आहे” ; अशी कॅप्शन दिली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा खुश झाले आहेत आणि “जेव्हा आई हसली ना ते बघून असं अंगावर शहारे आले ते हसू नव्हतं तर तो एक आनंद होता… खरंच ते बघून मनाला खूप आनंद झाला… म्हणजे बघा ना आपल्या पिढीतली आई छोट्या-छोट्या गोष्टीत सुद्धा किती आनंदी होते”, “मुलांसाठी करता करता जेव्हा मुले आपल्या आई-बाबासाठी करतात ना ते पाहून ही भारी वाटतं”, “त्या केकची किंमत काय असेल ते माहीत नाही. पण, तो केक बघून त्या माऊलीच्या चेहऱ्यावर जे हसू आलं त्याची किंमत करता येणार नाही” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.