Viral Video: जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यूही निश्चित असतो. त्यामुळे कधी काळाचे सावट कोणावर झडप घालेल हे कोणीही सांगू शकत नाही. सोशल मीडियावर अशा घटनांचे व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात. त्यातील काही लोकांचा जीव सहज जाताना दिसतो; तर काही व्हिडीओंमध्ये मृत्यूचे सावट येऊनही ती व्यक्ती जिवंत राहते. अशा घटना पाहिल्यावर प्रत्येक जण ‘देव तारी त्याला कोण तारी’ हे एकच वाक्य म्हणताना दिसतो.

सोशल मीडियावर वारंवार आपण नवनवीन व्हायरल व्हिडीओ पाहतो. त्यात कधी विविध रील्स, गाणी, डान्स असे युजर्सचे मनोरंजन करणारे व्हिडीओ असतात; तर कधी अपघाताचे, प्राण्यांच्या शिकारीचे, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचे व्हिडीओदेखील बऱ्याचदा सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. अशा व्हिडीओंमुळे आपला नेहमीच थरकाप उडतो. आता व्हायरल होत असलेला व्हिडीओ तुम्ही असेच शॉक व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका नदीमध्ये दोन मुले खेळत असतानाच अचानक खूप वेगाने नदीचा प्रवाह वाढतो आणि मुलांच्या दिशेने येतो त्यावेळी नदीचा प्रवाह येत असल्याचे पाहून किनाऱ्यावर पोहचण्याचा प्रयत्न करीत असलेल्या मुलांच्या अंगावर थडकते. नशीब बलवत्तर म्हणून मोठी लाट अंगावर येऊनही मुलं त्यातून सुखरून बचावतात. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @official_vishwa_96k या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत हजारो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “नशीब चांगलं लेकरांचं”. आणखी एकाने लिहिलेय, “बापरे मृत्यूचे सावट दिसले”. आणखी एकाने लिहिलेय, “देवाचा आशीर्वाद”.