Viral video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल. हे कुणीचं सांगू शकत नाही. दररोज निरनिराळ्या गोष्टी लोकांचं मनोरंजन करतात. प्राण्याचे तर अनेक मजेशीर, विचित्र, भयानक व्हिडीओ पहायला मिळतात. अशातच यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडलीये. यात अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. तर काही व्हिडीओ असे असतात जे थेट काळजाला भिडतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय, जो पाहून अनेकजण भारावून गेले आहेत. या व्हिडीओमध्ये ️ मंत्रमुग्ध करणारं भजन ऐकून हरीणही चिमुकल्यांसह तल्लीन झालंय.

भजनात दंग झाले हरीण

भक्ती संगीत ऐकल्याशिवाय आजही अनेकांचा दिवस सुरू होत नाही. ग्रामीण भागात आजही सकाळच्या प्रहरी रेडिओवर भक्ती संगीत ऐकू येत असते. अनेक जण भजनात तल्लीन होतात, मात्र तुम्ही कधी हरणाला भजनात मंत्रमुग्ध झालेलं पाहिलंय का. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चक्क हरीण हिरपाठामध्ये आनंदाने पावली खेळत नाचत बागडत आहे. आजूबाजूला लहान मोठी मुलं भजनाच्या तालावर नाचताना पाहून हे हरीणही भजनात तल्लीन झालं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: समुद्राच्या मधोमध खेळतायेत क्रिकेट, बॉल पाण्यात पडू नये म्हणून केलेला जुगाड पाहून म्हणाल वाहह…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल झाला असून, हा व्हिडीओ अहमदनगर येथील बालंटाकळी तालुक्यातील शेवगाव या ठिकाणचा आहे.