आपल्या देशात अशी कोणतीही समस्या नसेल ज्यासाठी लोकांनी कोणता ना कोणता जुगाड केला नसेल. या जुगाडमुळे अनेक समस्यांवर अगदी काही वेळात समाधान शोधले जाते. कित्येकदा तर महागड्या वस्तू स्वस्त बनवण्यासाठी लोकं देसी जुगाडचा वापर करतात. सोशल मीडियावर देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर या व्यक्तीने थंडीपासून बचाव करण्यासाठी जी शक्कल लढवली आहे, ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने असा केला जुगाड

सध्या संपूर्ण देशात कडाक्याची थंडी पसरली आहे. या थंडीत दुचाकीने प्रवास करणे फारच कठीण आहे. व्हिडीओमधील हा व्यक्ती देखील असाच प्रवास करताना दिसत असून त्याला प्रचंड थंडी वाजत असल्याचं समजतंय. या थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने एक शक्कल लढवली आहे. हा व्यक्ती दुचाकी चालवणाऱ्याच्या मागे बसला असून थंडीपासून वाचण्यासाठी त्याने चक्क एका पुठ्ठ्याच्या बॉक्सचा आधार घेतला आहे.

Video : ‘हा’ कुत्रा झालाय स्केटिंग मास्टर; सोशल मीडियावर होतेय वाहवाह

कडाक्याच्या थंडीतही भारतीय जवानांचा साहसी पराक्रम पाहून तुमचाही उर अभिमानाने दाटून येईल

जेव्हा दुचाकी चालवणारा वेगात गाडी चालवत होता तेव्हा या व्यक्तीने पुठ्ठयाच्या बॉक्सच्या मदतीने स्वतःला पूर्णपणे झाकून घेतले होते. थंडीपासून वाचण्यासाठी त्याने हा जुगाड केला. तथापि, थंडीपासून त्याचा पूर्णपणे बचाव तर झाला नसेलच परंतु काही काळ त्याला दिलासा नक्कीच मिळाला असेल. त्याला बघून मागील वाहक देखील चाट पडले. एकाने तर त्याचा व्हिडीओही बनवला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकदा लोकं कोणतंही काम करत असताना काहीतरी जुगाड वापरण्याचा प्रयत्न करतात. परंतु अनेकदा काही लोक जुगाडच्या नावावर प्रमाणाच्या बाहेर वेगवेगळ्या ट्रिक आजमावत असतात. यामुळेच त्यांची खिल्लीही उडवली जाते. असाच काहीसा हा व्हिडीओ असून या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.