Fact Check Of Viral Video DMK workers Beating A Man : लाईटहाऊस जर्नालिझमला एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळून आले. त्यात असा दावा केला जात आहे की, द्रमुकच्या (DMK) कार्यकर्त्यांनी रेणुकराजन नरसिंहन नावाच्या व्यक्तीला मारहाण केली, ज्याने हिंदू मंदिरांमधील कथित अनियमिततेबद्दल सरकारविरुद्ध खटला दाखल केला होता. हा व्हिडीओ त्रिची येथील न्यायालयाच्या आवारात काढण्यात आला होता, असा दावा करण्यात आला होता.

तपासादरम्यान, आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ तेलंगणातील असून, २०२२ चा आहे. त्यामुळे व्हायरल झालेला दावा दिशाभूल करणारा आहे.

काय होत आहे व्हायरल?

एक्स (युजर) महावीर जैनने व्हायरल व्हिडीओ त्याच्या अकाउंटवरून दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला. या व्हिडीओला ‘रेणुकराजन नरसिंहन यांनी हिंदू मंदिरांमधील कथित अनियमिततांबद्दल डीएमके सरकारविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. आज त्यांच्यावर त्रिची न्यायालयाच्या आवारातच डीएमकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. ही बातमी सगळीकडे शेअर करा आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवाज उठवा. नाही तर, जे एक प्रामाणिक हिंदू आपल्यासाठी उभे आहेत, त्यांच्या बाबतीत आपण गप्प राहिलो, तर ते एक पाप असेल’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

इतर युजर्सदेखील अशाच दाव्यांसह हा व्हिडीओ शेअर करीत आहेत…

https://twitter.com/athavale_abhi1/status/194101906690459687

तपास :

आम्ही व्हिडीओमधून काढलेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरू केला.

आम्हाला [suspicious link removed] वरील एका लेखात एक स्क्रीनशॉट अपलोड केल्याचे आढळले.

https://www.sakshipost.com/news/telangana/devotees-demand-arrest-dalit-leader-bairi-naresh-disparaging-remarks-against-lord

या लेखात म्हटले होते, “हैदराबाद शहर पोलिसांनी दलित नेते आणि ‘भारत नास्तिक समाजम’चे अध्यक्ष बैरी नरेश यांच्याविरुद्ध दोन दिवसांपूर्वी एका सार्वजनिक सभेत भगवान अयप्पा स्वामींबद्दल ‘अपमानजनक’ टिप्पणी केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. नरेश यांच्यावर भारतीय दंड संहिता (IPC)च्या कलम १५३ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

हा लेख डिसेंबर २०२२ मध्ये अपलोड करण्यात आला होता.

आम्हाला याबद्दल अधिक बातम्या आढळल्या: https://www.thehindu.com/news/national/telangana/two-arrested-for-objectionable-remarks-against-hindu-gods/article66324529.ece

https://theprint.in/india/atheist-association-president-bairi-naresh-arrested-after-making-insulting-remarks-about-lord-ayyappa-swamy/1292037

आम्हाला hmtv तेलुगू न्यूजच्या यूट्युब चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडीओदेखील आढळला: https://www.youtube.com/watch?v=UtcHyrMrimk&t=113s

कॅप्शनमध्ये होते की, अयप्पाच्या भक्तांनी बैरी नरेशला त्याच्या वादग्रस्त टिप्पण्यांसाठी मारहाण केली.

बैरी नरेशला नंतर अटक करण्यात आली: https://www.andhrajyothy.com/2022/telangana/bairi-naresh-arrested-pvch-981124.html

मात्र, ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती, तो बलराज होता; ज्याला नरेशच्या गटातील व्यक्ती समजले गेले होते. पण, अहवालांमध्ये नमूद केल्याप्रमाणे एका निदर्शनादरम्यान, बलराजला एका वेगळ्या गटाचा होता. मग पोलिसांनी या मारहाणीत हस्तक्षेप केला, त्याला वाचवले आणि पोलीस ठाण्यात नेले. बलराजचा दावा आहे की, तो नरेशच्या गटात सामील नव्हता.

https://epaper.eenadu.net/Home/ShareImage?Pictureid=9865577

अहवालात नमूद केले आहे की, ही घटना तेलंगणाच्या कोसगी शहरात घडली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष : तेलंगणातील एक जुना, असंबंधित व्हिडीओ अलीकडील असल्याचा आणि डीएमके कार्यकर्त्यांनी हिंदू मंदिरांमधील अनियमिततेबद्दल सरकारविरुद्ध खटला दाखल करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्याच्या दाव्यांसह शेअर केला जात आहे. त्यामुळे आमच्या तपासानुसार व्हायरल झालेला दावा दिशाभूल करणारा आहे.