माणसांप्रमाणे प्राणीदेखील हुशार असतात, आपल्या फायद्याची गोष्ट त्यांना पटकन समजते. एखादी गोष्ट हवी असल्यास मालकाकडे हट्ट करणाऱ्या किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे शक्कल लढवणाऱ्या प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. त्यातील काही व्हिडीओ हे आपल्याला अचंबित करणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा जेवण मिळवण्यासाठी त्याच्या मित्राला चकमा देत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक कुत्रा जेवत असल्याचे, तर दुसरा कुत्रा बेडवर उभा राहून बाहेर बघत असल्याचे दिसत आहे. बेडवर असणाऱ्या कुत्र्यालाही जेवण हवे असल्याने तो एक शक्कल लढवतो. तो बाहेर बघत भुंकू लागतो, जेणेकरून दुसऱ्या कुत्र्याला असे वाटेल की बाहेर कोणीतरी आहे आणि तसेच होते तो बाहेरच्या दिशेला बघत भुंकू लागल्यावर जेवणारा कुत्रा तिथे येउन बाहेर बघू लागतो. पण तेवढ्यात हा हुशार कुत्रा जेवणावर ताव मारतो. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा: लिफ्ट बंद पडताच त्यात तीन लहान मुली अडकल्या अन्…; Viral Video ने वाढवली पालकांची चिंता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झाले असून, अनेकांनी कमेंट्समध्ये या कुत्र्याच्या युक्तीचे कौतुक केले आहे.