प्राण्यांमध्ये असणाऱ्या दयेचा आपल्याला अनेकदा प्रत्यय येतो. त्यांना आपल्यासारखे बोलता येत नसले तरीही त्यांच्या कृतीतून त्यांच्या भावना व्यक्त होत असतात. त्यांच्या मालकाप्रती त्यांना असणारे प्रेम आणि त्याविषयीचे काही प्रसंग याबाबतही आपण अनेकदा ऐकतो. इतकेच नाही एकाच घरात दोन किंवा त्याहून जास्त पाळीव प्राणी असतील तर ते एकमेकांशी दंगामस्ती करतात मात्र तितकेच प्रेमही करतात. त्यांच्याकडून शिकण्यासारख्याही अनेक गोष्टी असतात. या प्राण्यांच्या काही आश्चर्यकारक गोष्टी पाहून आपणदेखील अचंबीत होतो. ब्राझीलमधील एका कुत्र्याचा फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. ज्यामध्ये हा कुत्रा रस्त्यातील दुसऱ्या कुत्र्याला आपल्याकडील ब्लँकेट देताना दिसतो. अशीच एक घटना नुकतीच घडली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कुत्रा आपल्या प्रतिबिंबालाच आपल्याकडील हाड देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
लहानपणी आपण शाळेत ऐकलेल्या गोष्टीतला लोभी कुत्रा आठवतोय? त्याच्या तोंडात एक हाड असते. पाण्यात आपलेच प्रतिबिंब पाहणाऱ्या कुत्र्याला असे वाटते की पाण्यातल्या कुत्र्याकडेही हाड आहे. ते हाड घेण्यासाठी तो आपले तोंड उघडतो आणि त्याच्या तोंडातील हाड खाली पडते. अशाच प्रकारची एक घटना नुकतीच घडली आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र यामध्ये कुत्र्याला आरशामध्ये स्वतःचे प्रतिबिंब दिसत असून तो आपल्याकडील हाड त्या प्रतिबिंबात दिसणाऱ्या कुत्र्याला देण्याचा प्रयत्न करतो. आरशात दिसणारा कुत्रा म्हणजे आपलेच प्रतिबिंब आहे याची जाण नसल्याने हा कुत्रा असे करतो. मात्र यामुळे त्याच्यातील दयाळूपणाचे दर्शन घडते.
Twitter called me a good boy.
By the rules of Dog Twitter, I win Twitter. https://t.co/m4SGee2D1k
— Agent Auggie (@agentauggie) September 8, 2017
लेखक एरीक स्मिथ याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपल्या पाळीव कुत्र्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अवघ्या काही वेळात त्याला ६५ हजार रिट्विटस मिळाले आहेत.