Viral Video: उन्हाळ्यात उष्णतेच्या त्रासावर मात करण्यासाठी आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी एक ग्लास ताज्या फळांचा रस पिण्याची इच्छा प्रत्येकालाच होते. आंबा, संत्री, डाळिंब, कलिंगड आदी विविध प्रकारच्या फळांचा ज्युस तुम्ही घरच्या घरी इलेक्ट्रिक ज्युसर किंवा मिक्सरच्या मदतीने बनवू शकता. पण, तुमच्या घरी जर ज्युसर नसेल तर? त्यावर उपाय म्हणून एका वृद्ध महिलेनं मिक्सर किंवा ज्युसरशिवाय कलिंगडाचा सरबत बनवून दाखविला आहे.

व्हिडीओत आजी हिरव्यागार शेतात कलिंगड घेऊन बसलेली दिसत आहे. सुरुवातीला कलिंगडाच्या वरचा भाग सुरीच्या मदतीनं कापून घेत, त्यानंतर रवीच्या (Hand Blender) साह्यानं मिश्रण बारीक करून घेते आहे. त्यानंतर आजी सर्व मिश्रण मातीच्या भांड्यात ओतताना दिसत आहे. त्यानंतर कलिंगडाच्या आतमध्ये उरलेले कलिंगडाचे कणसुद्धा चमच्यानं काढून घेतले आहेत. कलिंगडाचे सरबत कशा प्रकारे बनवले जात आहे ते एकदा बघा.

हेही वाचा…काय सांगता? पट्ठ्याने लाकूड, बांबू नाही तर चक्क गाजरापासून बनवली बासरी, VIDEO पाहून म्हणाल, ‘टॅलेंट’

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, एका मोठ्या टोपात सर्व मिश्रण रवीच्या साह्यानं बारीक करून घेतलं जात आहे. नंतर कलिंगडाला एक नळ (वॉटर फिल्टर) लावून घेतला आहे. त्यानंतर तयार झालेलं हे सरबत पुन्हा कलिंगडात ओतताना बिया वेगळ्या करण्यासाठी गाळणीद्वारे गाळूनसुद्धा घेतलं जात आहे. त्यानंतर त्यात साखर व बर्फ घातला आहे. सगळ्यात शेवटी नळ खोलून हे सरबत एका ग्लासमध्ये घेऊन, आजी त्याचा स्वाद घेताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @grandma_cfc या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. काही जण आजीच्या या उपायाला ‘वेळ घालवणं’ असं म्हणत आहेत; तर अनेक जण ‘घरच्या घरी सरबत बनविण्याची ही भारी कल्पना आहे’, अशा अनेक कमेंट्स व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत. एकंदरीतच आजीबाईंची ही युक्ती अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.