Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला पोट धरून हसवणारे तर काही थक्क करणारे असतात, असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात. त्यांना सतत दुसऱ्यांच्या राहणीमानाचं आणि त्यांच्या आरामदायी जीवनाचं कौतुक वाटतं. शिवाय श्रीमंत मित्रांच्या तुलनेत आपण खूपच कमी असल्याची तक्रार ते खासगीत करत असतात. मात्र, आपल्या आजुबाजूला काही लोक असेही असतात जे कोणत्याही तक्रारी न करता आयुष्याचा पुरेपूर आनंद घेतात. अशाच एका आजोबांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आयुष्यात प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधला की समाधान आपोआप मिळतं हे दाखवणारा हा व्हिडीओ आहे. यामध्ये हे आजोबा लहान मुलांच्या जंपींग जपांगवर उड्या मारत आहेत. त्यांचं शरीर थकलं असलं तरी त्यांच्यातला उत्साह हा तरुणांना लाजवेल असाच आहे. त्यांचा हा एकच नाहीतर अनेक व्हिडीओ आहेत. या वयात दुखण्यानं रडत बसण्यापेक्षा हे आजोबा अशाप्रकारे आनंद लुटत आहेत. हा व्हिडीओ पाहून एकच कळतं, आयुष्य खूप छोटं आहे ते मनसोक्त जगा अगदी मनाला वाटेल तसं. आयुष्य सुंदर आहे. मजा-मस्ती करा आणि मनसोक्त जगा. हा व्हिडीओ पाहून सर्वच आजोबांचं कौतुक करत आहेत.आजचाच दिवस शेवटचा, क्या पता कल हो ना हो..असं म्हणते हे आजोबा त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा पुरेपुर आनंद घेत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लहान मुलांच्या जंपींग जपांगमध्ये हे आजोबा जाऊन उड्या मारत आहेत. खरंतर यामध्ये लहान मुलं खेळतात मात्र या आजोबांनाही यामध्ये जाण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे कुणाचाही विचार न करत हे आजोबा थेट आतमध्ये जाऊन त्यावर आनंदानं उड्या मारताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

khaaledsyyd नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “या वयात अशा उड्या मारत्यात तारुण्यात कसे उड्या मारल्या असतील” तर आणखी एकानं “एकच नंबर भाऊ” अशी प्रतिक्रिया दिली आहे.