Viral Video Man Leaves His Chawl After 22 Years : चाळ हा शब्द जरी उच्चारला तरी नकळत मुंबईकरांच्या डोळ्यात पाणी येते. एखादा व्हिडीओ एडिट केल्यासारख्या सगळ्या जुन्या आठवणी एकदम झटकन डोळ्यासमोरून जाऊ लागतात. हसलो, खेळलो, भांडलो तरीही ‘आमची चाळचं बरी होती’ असे नकळत बोलून जाणाऱ्या आपल्यातले आज अनेक जण स्थलांतरामुळे बिल्डिंगमध्ये राहायला आले आहेत. मुंबईत आलेल्या अनेकांना आपल्या आयुष्याची सुरुवातील चाळीतल्या घरापासून केलेली असते. त्यामुळे मुंबई आणि चाळीचे नाते शब्दात सांगणे कठीण असते.
आज सोशल मीडियावर असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. @_iamaaron_29 इन्स्टाग्राम युजर २२ वर्षानंतर त्याची चाळ, त्याचं घर सोडून दुसरीकडे राहायला जाणार असतो. यादरम्यान शेवटचे चाळीतले काही क्षण त्याने व्हिडीओत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चाळीतल्या मंडळींनी केक कापून आणि खास सेलिब्रेशन ठेवून हा दिवस आनंदाने साजरा केला आहे. तर चाळीतल्या मित्र-मैत्रिणींना नकळत धन्यवाद म्हणण्यासाठी त्याने सगळ्या जुन्या, खेळकर आठवणींचे काही फोटोज जोडून कॅप्शनमध्ये त्याच्या भावना मांडल्या आहेत.
आयुष्य कुठेही घेऊन गेले तरी, एकमेकांकडे परतण्याचा मार्ग शोधू… (Viral Video )
कॅप्शनमध्ये “या चाळीत घालवलेल्या २२ वर्षांनी मला फक्त घर दिले नाही तर मला एक कुटुंब दिले आहे. असंख्य आठवणी माझ्या हृदयाचा एक भाग झाल्या आहेत; ज्या कायमस्वरूपी माझ्या मनात राहतील. बालपणीच्या हास्यास्पद गोष्टी, रात्री उशिरा होणाऱ्या गप्पा, सणांपासून ते दररोजच्या चहाच्या ब्रेकपर्यंत, आमच्या चाळीच्या प्रत्येक कोपऱ्यात आम्ही केलेली मजा. ते म्हणतात की काही निरोप शेवटचे असतात. पण आमचा त्यापैकी एक नाही.
व्हिडीओ नक्की बघा…
कारण – ही जागा, या भिंती, गल्लीतील हास्य, एकत्र केलेलं जेवण आणि प्रत्येक मूर्खा सारखे केलेलं भांडण आदी आता माझ्या आठवणींचा एक भाग झाल्या आहेत. जरी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात असलो तरीही आपली चाळी जी आपले जग होती ती लवकरच आता बदलणार आहे. पण आपण इथे जी नाती बनवली आहेत ती कधीच बदलणार नाही. आयुष्य आपल्याला कुठेही घेऊन गेले तरी, आपण नेहमीच एकमेकांकडे परतण्याचा मार्ग शोधू. माझ्या चाळीतील मित्र-मैत्रिणींनो तुम्ही फक्त शेजारी नाही तर माझे कुटुंब आहात आणि कुटुंब कधीही निरोप घेत नाही” ; अशी सुंदर कॅप्शन त्याने व्हिडीओला दिली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @_iamaaron_29 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि “दादा चांगल्या कारणासाठी सोडून जात असेल, मोठ्या घरात जात असेल तर त्याच्यासाठी आनंदी व्हा. स्थलांतरण फार कठीण असते विशेषतः चाळीमधून…” ; अशी सुंदर कमेंट केली आहे.