Viral Video Grandparent’s 50th Wedding Anniversary : लग्न हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस असतो. कारण इथे फक्त दोन व्यक्ती नाही एकत्र तर दोन कुटुंब सुद्धा एकत्र येत असतात. पण हल्ली घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पण, पूर्वीची जोडपी भांडून सुद्धा एकमेकांची साथ सोडायची नाही. माहेर-सासरचे कुटुंब, मुलं-बाळ यांचा विचार करून एकमेकांना माफ करून, नाती टिकवून ठेवायची. तर व्हायरल व्हिडीओतील जोडप्याचा लग्नाचा ५० वाढदिवस साजरा केला जातो आहे आणि हा दिवस खास करण्यासाठी कुटुंबाने पुन्हा एकदा त्यांचे लग्न लावून दिले आहे.
@sayukdm_28 आणि @theneverendingtaless या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये आजी-आजोबांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस हटके पद्धतीने साजरा केला जातो आहे. घरातील छोटी मुले मावशी, ताई-दादाच्या लग्नात तयार होतात अगदी तशी तयार झाली आहेत. ५० दिव्यांची परात ठेवून, आजीला नऊवारी साडी आणि आजोबांना सदरा- टोपी घालून अंतरपाटासमोर उभं केलं आणि एकेमकांना हार घालून त्यांचे पुन्हा एकदा लग्न लावले. त्यानंतर रिसेप्शनसाठी निळ्या रंगाची साडी आणि शर्ट घालून आजी-आजोबांनी केक कापला आणि चिमुकल्यांनी डान्स करून कार्यक्रमाचा शेवट केला.
लक्ष्मी नारायणाचा जोडा (Viral Video)
असं एकचं नातं आहे ज्याचा आपल्याकडे पूर्ण अधिकार असतो ते म्हणजे नवरा आणि बायकोचं. “जगात फक्त हा फक्त माझाच नवरा आहे”, आणि “ही फक्त माझीच बायको आहे”, असं हक्काने म्हणता येतं.आज याच हक्काच्या नात्याला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत आणि हा खास दिवस आणखीन खास करण्यासाठी कुटुंबाने पुन्हा एकदा त्यांचे लग्न लावून दिले आहे. ५० वर्षे एकत्र घालवूनही नव्या जोडप्यासारखं तेज आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर दिसते आहे. एकदा बघाच हा सुंदर व्हिडीओ…
व्हिडीओ बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @sayukdm_28 आणि @theneverendingtaless या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “माझे आजी-आजोबा पुन्हा लग्न करतायत” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “लक्ष्मी नारायणाचा जोडा”, “खूप नशीब लागतं हा दिवस बघायला” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.