Viral Video Pet Cat Dohale Jevan Ceremony : तुम्हाला तुमच्या आसपास वेगवेगळ्या प्रकारचे प्राणीप्रेमी दिसतील. कोणी कासव, कोणी पोपट, कोणी मासे, तर कोणी श्वान आणि मांजरी घरात पाळतात. अनेकदा ते प्राण्यांसाठी करत असलेल्या उपक्रमांविषयी सोशल मीडियावरून माहिती देत असतात. एवढेच नाही तर आपल्या कुटुंबाचा एक भाग समजून त्यांचेही वाढदिवस साजरे करतात. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; जे पाहून तुम्ही तर थक्कच होऊन जाल. आज एका पाळीव प्राण्यांच्या कुटुंबाने चक्क डोहाळेजेवण ठेवले आहे.

“कुणीतरी येणार येणार गं. चेरीचे डोहाळेजेवण” असे कागदाचे पोस्टर लावून, फुलांनी सजावट करून या खास डोहाळेजेवणाचा घाट घातला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, चेरी कोण? तर चेरी म्हणजे या कुटुंबाची लाडकी मांजर. तर या चेरीला अगदी चंद्रकोर टिकली लावून, तिच्या गळ्यात ठुशी घालून, गुलाबी रंगाचे अंगावर कापड घालून गर्भवतीप्रमाणे तिला सजवले आहे. मुलगा, मुलगी की दोन्ही अशा तिन्ही पर्यायाच्या वाट्या या मांजर आणि बोक्यासमोर ठेवल्या आहेत.

परमात्मा आपणास एक गोंडस बाळ देवो हीच प्रार्थना… (Viral Video)

बोक्याच्या डोक्यावर टोपी घालून मांजरीला चंद्रकोर टिकली लावून गर्भवतीप्रमाणे सजवून या प्राण्यांचे अगदी खास पद्धतीने डोहाळेजेवण ठेवले आहे; जे पाहून तुम्ही एकीकडे कौतुकही कराल आणि पोट धरूनही हसाल. अशाप्रकारे पाळीव प्राण्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे सन्मान देण्यात आला आहे आणि अगदी माणसांसारखे या खास पाळीव जोडप्याचं डोहाळजेवण आयोजित करण्यात आलं आहे. आजवर तुम्ही प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील; पण प्राण्यांच्या डोहाळजेवणाचा हा अनोखा कार्यक्रम तुम्ही आजवर पाहिला नसेल.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. “पैशे जास्त झाल्यावर उडवायचे कसे? तर असे”, “एवढा रिकामा वेळ असतो तरी कधी लोकांना”, “अभिनंदन माऊ श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा आपणास एक गोंडस बाळ देवो हीच प्रार्थना”, “लोकं एवढे फुकट झाले आहे हे आज कळालं. कंटेंट साठी काय पण”, “चला उंदीर वाढायला घ्या पटकन पाहुण्यांना भुका लागल्या असतील” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.