Family Surpris For Daughter Viral Video : लहानपणी आपल्याकडे सायकल असावी अशी इच्छा सगळ्यांचीच असते. पण, घरात बाबा एकटेच कमावणारे, ठेवायला जागा नाही आदी अनेक गोष्टींमुळे काही जणांचे सायकल चालवण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये एका चिमुकलीचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे.

संपूर्ण कुटुंबाने लेकीला खास सरप्राईज देण्यासाठी सगळी तयारी केलेली दिसते आहे. सायकल आणून दारात ठेवली आहे आणि त्यावर गुलाबी रंगाचा मखमली कापड सुद्धा टाकला आहे. व्हिडीओ जसा पुढे जातो तसे कुटुंबातील सगळे सदस्य लेकीला बाहेर घेऊन येतात. नक्की काय झाकून ठेवले आहे हे पाहण्यासाठी ती हळूहळू सायकलवरचा कापड काढते. कापड काढताच तीला सायकल दिसते. सायकल पाहून ती पहिल्यांदा काय करते हे व्हायरल व्हिडीओतून तुम्ही सुद्धा बघा…

ही भेट तुला नेहमीच लक्षात राहील… (Viral Video)

काही जण छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंदी होतात. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये कुटुंबाने लेकीसाठी आणलेली ही सायकल पाहून ती खूप खुश झाली आहे. कुटुंबाने तिची सायकल विकत घेण्याची इच्छा नकळत पूर्ण केल्यामुळे ती भावुक झाली आणि सायकलला हात लावण्याआधी किंवा त्याच्यावर बसण्याआधी लेक बाजूला उभ्या असणाऱ्या महिलेला मिठी मारताना दिसली आहे. त्यानंतर कुटुंबातील एक सदस्य येऊन ‘हीच खरी मुमेंट आहे’ असे इशाऱ्यांद्वारे दाखवतो आणि मग कुटुंबात एकच आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @thefakemediia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “सायकलला हात लावण्याआधी तिने आधी महिलेला मिठी मारली” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा इमोजीसह त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. तसेच “ही भेट तुला नेहमीच लक्षात राहील”, “छोटासा आनंद एखाद्या गोड क्षणासारखा” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…