Father Rescue Son Viral Video : झाडाप्रमाणे स्वतः ऊन, वारा, पाऊस सहन करून कुटुंबाला सावलीत ठेवण्याचे काम बाबा करत असतात. प्रत्येकाला आनंदी ठेवणाऱ्या आईची मेहनत दिसते. पण, बाबांचे प्रेम आणि कष्ट फारसे दिसून येत नाही. त्यामुळे आई कसे जगायचे कसं शिकवतं असली तरीही बाबा या जगात टिकून कसे राहायचे हे नकळत शिकवत असतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये पुराच्या पाण्यातून बाबांनी त्यांच्या दोन मुलांना वाचवले आहे.
व्हायरल व्हिडीओचे ठिकाण आणि या घटनेची तारीख माहिती नाही. पण, पुराच्या पाण्यात बाबा आणि त्यांची दोन मुले अडकली आहेत. तिथे अनेक जण उपस्थित असूनही फक्त बघण्याची भूमिका घेत आहेत. पण, पाण्याच्या प्रवाहात दोन्ही मुलांना दोन्ही हातांनी पकडून, पाण्याच्या प्रवाहात स्वतःचा तोल सांभाळत बाबा दोन्ही मुलांना सुखरूप बाहेर घेऊन आले आहेत; जे पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
खरंच वडिलांसारखा आधारस्तंभ कोणीच असू शकत नाही… (Viral Video)
बाबांनी धीर सोडला असता, परिस्थितीला घाबरून गेले असते तर कदाचित दोन्ही मुलांबरोबर तेही पुराच्या पाण्यात वाहून गेले असते. तिथे उपस्थित कोणाचीही पुराच्या पाण्यात उतरण्याची हिम्मत झाली नाही. पण, बाबांनी लेकरासाठी जीवाची बाजी लावली आणि त्यांना सुखरूप बाहेर काढले आहे; जे पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. पुराच्या पाण्यातून लेकरांना वाचवणाऱ्या बाबांची धडपड व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “कदाचित लाटा विसरल्या असतील की मुलांना त्यांच्या वडिलांनी पकडले आहे” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आलं हा व्हिडीओ पाहून… खरंच वडिलांसारखा आधारस्तंभ कोणीच असू शकत नाही”, “वडिलांचा जीवनात खूप मोठा आधार असतो”, “छोट्या छोट्या संकटला आपल्याला आई आठवते. पण मोठ मोठ्या संकटापुढे हा बापाच उभा असतो” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.