Father Respecting Mother Viral Video : महिलांचं मन समजून घेणं खूप कठीण असते असे मानतात. कारण – मनात काय आहे ते त्या स्पष्टपणे कधीच सांगत नाहीत. पण, जबरदस्ती न करता, अधिकार न गाजवता नवऱ्याने समजून घ्यावे, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यावे, त्यांना जे वाटतं ते मनमोकळेपणाने बोलता यावं; असे महिलांना सतत वाटत असते. पण, ही सुरवात प्रत्येकाने आपल्या जोडीदारापासून करायला हवी आणि आपल्या मुला-बाळांनाही महिलांच्या इच्छा-अपेक्षांचा आदर करायला शिकवले आहे. आज एका वडिलांनी आपल्या आईचा आदर कसा करावा, तिची मदत कशी करावी, तिच्यावर प्रेम कसे करावे याबद्दल नकळत त्यांच्या कृतीतून दाखवले आहे.
व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे अद्याप कळू शकलेलं नाही. @thelilroarsoumya या इन्स्टाग्राम युजरने तिच्या आई-बाबांच्या नात्याचा गोड क्षण कॅमेरात रेकॉर्ड करून घेतला आहे. आई झाडाची पूजा करते असते आणि यादरम्यान छोट्या हवन कुंडात हळद कुंकू वाहून पूजा करते असते. ही पूजा घराच्या बाहेर, दुपारी सुरु असल्यामुळे आईला प्रचंड गरम होत असते. पंखा लावण्याची सोय नसल्यामुळे बाबा तिच्यासमोर मिनी फॅन घेऊन बसतात. जेणेकरून आई पूजा करू शकेल आणि तिला गरम सुद्धा होणार नाही.
काकींना पूजेचं फळ मिळालं (Viral Video)
महागडे कपडे, मोबाईल्स, आलिशान गाडी आणि जबरदस्त लाईफस्टाईल असणारी मुलांचे आकर्षण सध्या कोणालाच राहिलेलं नाही. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे छोट्या-छोट्या गोष्टीत काळजी आणि आदर करणारा आणि समजून घेणारा जोडीदार असा असेच मत आता प्रत्येक मुलीचे आहे. बाबांनी नकळत घेतलेली आईची काळजी पाहून लेक सुद्धा भारावून गेली आणि तिने हा व्हिडीओ पोस्ट करत “त्याने मला दाखवले की, स्त्रीवर कसे प्रेम केले पाहिजे” अशी कॅप्शन दिली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @thelilroarsoumya या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून “ही स्त्री खूप भाग्यवान आहे”, “काकींना पूजेचं फळ मिळालं”, “आजच्या दिवसातील बेस्ट रील”, “असं साधं जीवन हवं “, “काही पुरुषांना या गोष्टी माहितीच नसतात”, “ह्यांच्यासारखी संस्कारी पिढी शोधणे कठीण” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसले आहेत.