Father Risked His Daughters Life Viral Video : इन्स्टाग्राम, यूट्यूब, टिकटॉक, फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील व्हिडीओ खूप लोकप्रिय आहेत. हे रिल्स पाहून आपण एखादा रील बनवून आपण प्रसिद्ध व्हावं असे आपल्यातील अनेक जणांना एकदातरी नक्कीच वाटले असेल. पण, रील बनवण्यासाठी कन्टेन्ट कसा असावा, आपण एखादी गोष्ट मुदाम तर करत नाही आहे ना, रीलसाठी आपण स्वतःच आणि इतरांचा जीव धोक्यात घालत नाही आहोत याचा विचार आपल्यातील प्रत्येकानेच केला पाहिजे. पण, आज सोशल मीडियावर एका वडिलांनीच तिच्या लेकीचा जीव धोक्यात घातला आहे.
व्हायरल व्हिडीओ राजस्थानमधील आहे. ४ जुलै २०२५ रोजी राजस्थानमधील रुडावल पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली. राजस्थानमधील स्थानिक रहिवासी उमा शंकर यांनी त्यांच्या पत्नी व लहान मुलीसह या धरणाला भेट द्यायला गेले होते. या धरणावर बाबांना एक रील शूट करायचा असतो. त्यासाठी ते लेकीचा जीव धोक्यात घालतात. बंध बरैथा धरणावर असणाऱ्या ब्रिजच्याकडेला दोन लोखंडी सळीने जोडून एक बॉक्स बसवलेला असतो. त्या बॉक्सवर जबरदस्ती लेकीला बसवताना दिसत आहेत.
रिलसाठी बाबांची स्टंटबाजी (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, एक रील तयार करण्याच्या प्रयत्नात, त्यांनी त्यांच्या लेकीचा जीव धोक्यात टाकला. कोणत्याही सुरक्षा उपकारांशिवाय त्यांनी वाहत्या पाण्याच्यावर असणाऱ्या ब्रिजच्या बाजूला बसवलेल्या बॉक्सवर लेकीला धोकादायकपणे बसण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर तिकडे बसल्यावर त्यांनी ‘कॅमेरामध्ये बघ’ असा इशारा सुद्धा केला. हा सर्व प्रकार घडत असताना तिथे आई देखील उपस्थित होती. पण, तिनेही आपल्या नवऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.
व्हिडीओ नक्की बघा…
या प्रदेशात पडणारा मुसळधार पाऊस यामुळे धरण ओसंडून वाहत होते. त्यामुळे स्थानिक आणि पर्यटक अनेकदा इथे भेट द्यायला येतात. पण, काही जण प्रसिद्धीसाठी त्यांच्या प्रियजनांना धोक्यात घालू शकतात याची त्यांना जाणीव नसते. असेच काहीसे आज व्हायरल व्हिडीओत बघायला मिळाले. सोशल मीडियावर या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध आणि ट्रोल झाला. त्यामुळे उमा शंकर यांनी तो व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून डिलीट केल्याचे वृत्त आहे. पण, आता हा व्हिडीओ @jist.news या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.