Viral Video Dad Sees Daughter In Traditional Nauvari Saree : लेकीच्या लग्नाचा विषय काढला तरी डोळ्यांत आणणारा बाबा तिच्यावर किती प्रेम करीत असेल याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. तिला कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही यासाठी आणि तिला प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी मिळू देत यासाठी बाबा धडपडत असतो. त्यामुळेच अनेकदा मुलांबरोबर कठोर वागणारा बाबा लेकीसमोर मात्र अगदी हळवा होऊन जातो. आज याच गोष्टीचे उदाहरण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत पाहायला मिळाले आहे.

आईने बाबा आणि लेकीच्या नात्यातील एक गोड क्षण नकळत शूट केला आहे. बाबा रूममध्ये कॉलवर बोलत असतात. तितक्यात आई तिच्या दोन्ही लेकींना नऊवारी नेसवून, छान तयार करून बेडरूममध्ये जायला सांगते. कॉलवर बोलता-बोलता अचानक बाबांचे लक्ष दोन्ही लेकींकडे जाते. पहिल्यांदा चिमुकल्यांनी साडी नेसलेली पाहून बाबांना अगदी शॉक बसतो. दोन्ही लेकींना जवळ घेऊन बाबा भावूक होतात आणि दोन्ही लेकींची नजर काढण्यास सुरुवात करतात. एवढेच नाही, तर त्यांना जवळ घेऊन, त्यांच्यावर प्रेमाचा वर्षावही करताना दिसतात.

बाबा-लेकीचे सुंदर नाते (Viral Video)

आपली लेक मोठी होताना बघणे हा आनंद बापासाठी काही वेगळाच असतो. कदाचित मोठी झाल्यावर ही लेक उडून जाणार आहे, ही जाणीव तिच्याविषयीचा हळवा भाव अधिकच गहिरा करीत असेल. असेच काहीसे व्हायरल व्हिडीओतून पाहायला मिळते आहे. चिमुकल्यांना पहिल्यांदा साडीत पाहून बाबा भारावून गेले आहेत आणि आपल्या मुली नकळत मोठ्या होत आहेत याची त्यांना जाणीव झाली आहे. चिमुकल्यादेखील बाबांचे हे रूप पाहून हरखल्या. बाबा आणि लेकीचे नाते कसे असते ते व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @glittergirls1719 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘जेव्हा बाबा पहिल्यांदा मुलींना साडीमध्ये बघतो’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “पुरुषांचे अनोखे रूप म्हणजे मुलींचा बाप”, “त्याने ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली, ती बघून मी भारावून गेले. दोघीही खूप सुंदर दिसत आहेत”, “वाह! त्याने लगेच फोन बाजूला ठेवून मुलींना मिठी मारली” आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.