Viral Video Father Simple Preparations To welcome Daughter : आयुष्यात कधीच कुठलेही काम पैशामुळे नको अडायला, असे प्रत्येकालाच वाटत असते. कारण- आजच्या काळात पैशाशिवाय माणसाच्या आयुष्यातले पानसुद्धा हलत नाही. पण, माणूस गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला कष्ट हे करावेच लागतात. गरिबाला श्रीमंत होण्यासाठी खूप मेहनत, तर श्रीमंताला श्रीमंती टिकवून ठेवण्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात. पण, या सगळ्यातसुद्धा आपण छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद कसा शोधतो यालाच खरे आयुष्य म्हणतात. आज सोशल मीडियावर असेच काहीसे दाखविणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
बाबांची लेक हॉस्पिटलमधून पहिल्यांदाच घरी येणार म्हटल्यावर फूल, रांगोळी आणि छोटे पाऊस लावून त्यांनी आधीच तयारी करून ठेवलेली असते. मग आई जन्मलेल्या बाळाला घेऊन, त्या फुलांच्या चादरीवरून एकेक पाऊल टाकत दारापाशी येते. त्यानंतर मग औक्षण करून लाल कुंकवाच्या पाण्यात चिमुकल्या लेकीच्या पाय बुडवून त्याचे ठसे दरवाजावर लावले जातात. त्यानंतर मग तिच्या इवल्याशा पावलांनी तांदळाने भरलेले माप ओलांडून चिमुकलीचा गृहप्रवेश होतो.
घर पाहू नका; चेहऱ्यावरचा आनंद बघा… (Viral Video)
सुखासाठी खरं तर पैशांची गरज नसते. योग्य व्यक्ती तुमच्याबरोबर असली की, अगदी व्हिडीओप्रमाणे तुम्ही मोजक्या पैशातसुद्धा तुमच्या आजूबाजूच्या माणसांना सुखी ठेवू शकता. चाळीत, छोट्याशा घरात राहत असल्यामुळे त्यांनी घरातल्या काही मोजक्या वस्तूंचा वापर करून, लक्ष्मीच्या स्वागतासाठी अगदी एखाद्या सणासारखी तयारी केली. तसेच घरातल्या मंडळींनीसुद्धा चेहऱ्यावर हास्य ठेवून, या इवल्याशा बाळाचे स्वागत केले; जे तुमच्याही डोळ्यांत नकळत पाणी आणेल. चिमुकलीचे केलेले स्वागत व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा…
https://www.instagram.com/reel/DM7xdGvSS6s/?igsh=dmM0cDViaTRwdzZs
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @dipakwagh633 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘पापा की परी’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून, “हौस पूर्ण करायला पैसाच लागत नाही, तर नवरा हौशी लागतो! हे वाक्य फक्त आजपर्यंत ऐकलं होत.. पण आज व्हिडीओतून बघितलं”, “आनंदी रहण्यासाठी पैसा महत्त्वाचा नसतो, तर योग्य व्यक्ती बरोबर असणे महत्त्वाचे असते हे या व्हिडीओने सिद्ध केलं आहे”, “खूप छान! गरिबी आयुष्यभर राहणार; पण प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे”, “घर पाहू नका; चेहऱ्यावरचा आनंद बघा”, “गरीब पैसा आहे; पण इथे मोठ्या मनाचा बाप खूप श्रीमंत आहे”, “खूप सुंदर वेलकम केलं तुम्ही वहिनी आणि बाळाचं”, “सोन्याची श्रीमंती येऊ दे तुम्हाला” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.