Dad Surprises Kids With New Mobile Phones : आई-वडील म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू. किंमत लिहिलेली नाण्याची दुसरी बाजू फारशी बघितली जात नाही. त्याचप्रमाणे बाबांच्या त्यागाचेही फारसे कौतुक केले जात नाही. वडील मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नसले तरीही मुलांच्या आयुष्यातील येणारी प्रत्येक वेळ चांगली जावो यासाठी ते दिवसरात्र मेहनत घेत असतात. आईची जागा कोणी घेऊ शकत नाही त्याचप्रकारे वडिलांची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. कारण – स्वतः दोन घास कमी खातील. पण, मुलांना ४ घास जास्त खायला देतील अशा या बाबांचा आज सोशल मीडियावर जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
सगळ्यात पहिला मिळणारा मोबाईल हा १०, ११ किंवा १२ वीचा निकाल किंवा मोठ्या भाऊ-बहिणी किंवा आई-वडिलांकडूनच गिफ्ट म्हणून तुम्हाला मिळालेला असतो. त्यामुळे हा पहिला मोबाईल मिळण्याच्या आनंद जगावेगळा असतो. तर भाऊ-बहीण आणि लाडक्या बाबांचा हा व्हायरल व्हिडीओ आहे. बाबांनी लाडक्या लेकासाठी सरप्राईज गिफ्ट म्हणून मोबाईल आणला आहे. भाऊ सरप्राईज म्हणून मिळालेले मोबाईल गिफ्ट अगदी उत्साहाने खोलून पाहत असतो. पण, लाडक्या लेकीला या गोष्टीची कल्पना नसते की, तिच्या बाबांनी सुद्धा सरप्राईज म्हणून मोबाईल आणलेला असतो.
ती खूपच खुश झाली असणार (Viral Video)
लेक भावाचा नवीन मोबाईल बघण्यात व्यस्त असते तितक्यात बाबा हळूच पिशवीतून आणखीन एक नवीन मोबाईल काढून, तिच्या पायाजवळ चुपचाप ठेवून देतात. लाडकी लेक भावाचा नवीन फोन बघण्यात एवढी व्यस्त असते की, तिच्या बाबांनी तिच्यासाठीही फोन आणला आहे याकडे तिचे लक्षच नसते. त्यानंतर बऱ्याच वेळानंतर तिचे लक्ष त्या बॉक्सकडे जाते. बॉक्स हातात घेऊन ती शॉक, आनंदी आणि उत्साही होते. हे पाहून बाबा आणि भावाच्या चेहऱ्यावरील आनंद तर बघण्याजोगा असतो.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @admin_peak या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “बाबा त्याच्या मुलांसाठी काहीही करू शकतात” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून “हे फक्त बाबाच करू शकतात”, “बाबा सुपरहिरो असतात”, “ती खूपच खुश झाली असणार”, “वडील म्हणजे अशी व्यक्ती जिच्या घामाचा एक थेंबही मुलं भरून काढू शकत नाहीत”, “ते उशिरा का होईना देतात” आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.