Traveling Overseas For Family Viral Video : स्वतःच्या किंवा जोडीदाराच्या नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशात जाणे अनेकांचे स्वप्न असते. पण, यामुळे आपण कुटुंबापासून दूर होऊन जातो. त्यांना सतत भेटणे आपल्यासाठी शक्य नसते. पण, अशा वेळी जर साता समुद्रापार येऊन तुम्हाला तुमच्या घरच्यांनी सरप्राईज दिले तर? तुमचाही आनंद गगनात मावणार नाही. बरोबर ना? तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे; त्यामध्ये एका बाबांनी आपल्या लेकीला परदेशात जाऊन सरप्राईज दिले आहे.

व्हायरल व्हिडीओ कुटुंबातील एक खास क्षण दाखवतो आहे. बाबांनी आपल्या लेकीला आणि नातीला सरप्राईज देण्याचे ठरवले. पण, बाबांची नात आणि लेक कॅनडाला राहत असतात. पण, नातीच्या पहिला वाढदिवससुद्धा असतो आणि बाबांना त्यांच्या लेकीलासुद्धा बघायचे असते. तर मग त्यासाठी बाबा सातासमुद्रापार पहिल्यांदाच प्रवास करून भारतातून कॅनडामध्ये जातात. प्रवास करून कॅनडामध्ये लेकीच्या घरी पोहोचतात. तेव्हा लेक स्वयंपाकघरात असते. बाबांना आलेलं पाहून ती एकदमच भारावून जाते.

लेकीला भेटण्यासाठी एवढ्या लांबचा प्रवास (Viral Video)

धावपळीच्या जीवनात अनेकदा आपण अनेकदा आपल्याच माणसांना वेळ द्यायला विसरून जातो. पण, बाबांचे काळीज आभाळाएवढे मोठे असते. त्यांनी आपल्या लेकीच्या आणि नातीच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी कॅनडाला जायचे ठरवले. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, बाबांना पाहून मुलगी शॉक होते आणि नंतर त्यांना अगदी प्रेमाने मिठी मारते. त्यानंतर बाबा नातीला जवळ घेऊन तिच्यावरही प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. एकदा बघाच हा प्रेमळ व्हिडीओ…

व्हिडीओ बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @anjana_varadan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘माझ्या वडिलांनी मला आणि माझ्या लेकीला भेटण्यासाठी एवढ्या लांबचा प्रवास केला’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी, “लेकीची रिअ‍ॅक्शन खूपच मस्त होती”,”व्हिडीओ पाहून खरंच डोळ्यांत पाणी आलं” आदी कमेंट्स; तर काही जणांनी त्यांना कुटुंबाने कशा प्रकारे याआधी सरप्राईज दिले याबद्दलच्या आठवणी शेअर केल्या आहेत.