Viral Video: अनेकदा सोशल मीडियावर प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होतात. या व्हायरल व्हिडीओंमध्ये कधी प्राणी शिकार करताना दिसतात; तर कधी काही प्राणी खेळताना दिसतात, त्याशिवाय बऱ्याचदा प्राणी एखाद्या संकटात अडकलेलेदेखील दिसतात. हे व्हिडीओ पाहून आपणही अनेकदा कासावीस होतो. असे व्हिडीओ क्षणार्धात लाखो व्ह्युजदेखील मिळवतात. सध्या असाच व्हिडीओ एका IAS अधिकारी महिलेने शेअर केला आहे; ज्यात हत्तीचे एक पिल्लू खड्ड्यात अडकलेले दिसत आहे.

IAS अधिकारी जंगालातील प्राण्यांचे व्हिडीओ बऱ्याचदा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करतात. हा व्हायरल व्हिडीओ IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी त्याच्या X (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घनदाट जंगलात असलेल्या एका खड्ड्यात हत्तीचे पिल्लू अडकले होते. जंगलात गस्तीसाठी गेलेल्या येथील कर्मचाऱ्यांना हत्तीचे ते पिल्लू दिसले. त्यावेळी तत्काळ त्यांनी पिल्लाला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याला यशस्वीपणे बाहेर काढले.

हा व्हिडीओ शेअर करीत IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘नियमित स्वरूपाची गस्त घालताना मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना हत्तीचे एक पिल्लू एका खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी धडपडताना दिसले. मग त्याच्या सुटकेसाठी ताबडतोब एक पथक तैनात करण्यात आले. त्या पथकाने यशस्वीरीत्या त्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर काढले आणि वाट पाहत असलेल्या आईसोबत त्या पिल्लाची भेट घडवून दिली. आता एक विशेष टीम आई व पिल्लावर लक्ष ठेवून आहे आणि ते सुरक्षित आहेत. DD MTR विद्या यांच्या नेतृत्वाखालील टीमला त्यांच्या जलद प्रतिसाद आणि अप्रतिम प्रयत्नासाठी धन्यवाद.’

हेही वाचा: ‘गुलाबी साडी’ गाण्यावर भरलग्नात नवरदेवाच्या मित्रांनी केला डान्स; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “मित्र असावे तर असे”

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओ X (ट्विटर)वरील @Supriya Sahu IAS या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय की, टीमचे खूप आभार. त्यांनी प्राण्याला वाचवले. तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेय की, ते हत्तीचे पिल्लू खूप क्यूट आहे. तर आणखी एकाने लिहिलेय की, त्या पिल्लाची आई किती आतुरतेने वाट पाहत आहे.