Viral Video Marathi Ganeshotsav Celebration In UAE : वर्षभर वाट पाहणारा गणेशोत्सव सण अखेर सुरू झाला आहे. काल घरोघरी बाप्पाचे आगमन झाले असून सगळीकडेच उत्साह बघायला मिळतो आहे. कोणाची सजावट तर कोणाची मूर्ती लक्षवेधी ठरते आहे. पण, यादरम्यान एक व्हिडीओ सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. अशा या शुभप्रसंगी परदेशात सुद्धा गणपती बाप्पाचे जोरदार आगमन झाले आहे; याची झलक व्हिडीओद्वारे व्हायरल होते आहे.

सजावटीच्या सामानांनी भरलेलं मार्केट असो किंवा बाप्पाच्या सुंदर मुर्त्या पाहून तुम्हाला हा व्हिडीओ भारतातला किंवा अगदी महाराष्ट्रातला वाटेल. पण, हा व्हायरल व्हिडीओ यूएईचा आहे; जिथे गणेशोत्सव साजरा झालेला दिसतो आहे. यूएईमध्ये राहणाऱ्या काही भारतीय मंडळी भारत देशापासून जरी दूर असले तरीही गणेशोत्सव अगदी थाटामाटात साजरा करताना दिसत आहेत. उत्सवाच्या काही आठवड्यांपूर्वीपासून दुबईमधील करामा आणि बुर या स्थानिक बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी जमलेली दिसते आहे.

गणपती बाप्पा मोरया… (Viral Video)

त्याचप्रमाणे अगदी भारतात गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी गणपती बाप्पाच्या मुर्त्या दुकानातून वाजत-गाजत घरी आणल्या जातात. अगदी त्याचप्रमाणे यूएईमध्ये सुद्धा भारतीय मंडळी आपली परंपरा जपताना दिसत आहेत. अनेक कुटुंबे त्यांच्या मुर्त्या ढोल ताशाच्या तालावर नाचत-गात आणत आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील हास्य, उत्साह आणि “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषाने भरलेल्या या छोट्या मिरवणुका भारतीय कला-संस्कृतीची आठवण करून देतात. एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ…

व्हिडीओ एकदा बघाच…

युएईमधील अनेक भारतीयांसाठी, गणेश चतुर्थी साजरी करणे हा केवळ एक उत्सव नाही, तर तो त्यांच्या वारसा, संस्कृतीला जोडण्याचा एक मार्ग आहे. मोदकांसारख्या पारंपारिक मिठाई बनवण्यापासून ते आरती करण्यापर्यंत, कुटुंबे प्रत्येक भारतीय चालिरीतूनुसार गणेशोस्तव इथे सारा करतात आणि परदेशात राहूनही भारतीयांना त्यांची संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवण्याचा अभिमान दर्शवतात.सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @the_walking_lens_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.