Viral Video: आजकाल समाजमाध्यमांचा वापर लोक आपली कला सादर करण्यासाठी करतात. यात काही जण गाणं गाताना तर काही जण अभिनय, डान्स, रेसिपी बनवताना दिसतात. डान्सचे व्हिडीओ शेअर करणाऱ्यांमध्ये अगदी चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचा समावेश असतो. सध्या एका तरुणीचा डान्स व्हायरल होत आहे.
हल्ली सोशल मीडियामुळे कधी कुठलं गाणं मोठ्या प्रमाणात चर्चेत येईल, हे सांगता येत नाही. या चर्चेत असलेल्या गाण्यांवर प्रत्येक वयोगटातील लोक, मोठमोठे कलाकारही ठेका धरताना दिसतात. हल्ली कधी ‘स्वप्नात आली राणी मुखर्जी’, हे गाणं तर कधी ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ ही गाणी खूप चर्चेत आहेत, ज्यावर लाखो युजर्स रील्स बनवताना दिसत आहेत. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी साडी नेसून ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसतेय. यावेळी तिच्या डान्स स्टेप्स आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव तुमचंही लक्ष वेधून घेतील.
पाहा व्हिडिओ

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @aarti_jalgaonkar या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत चार मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने लिहिलंय की, “व्वा काय नाचतेस, खूप सुंदर”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “पोरी आवडला तुझा डान्स”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “एक नंबर ताई.”