Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो लाखो व्हिडीओ शेअर होत असतात. व्हिडिओ स्क्रोल करताना कधी-कधी असे व्हिडिओ डोळ्यांसमोर येतात, जे पाहून यूजर्सला हसू आवरता येत नाही. म्हणजेच सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचं उत्तम माध्यम बनलं आहे. आज तुमचा मूड ऑफ असेल तर आम्ही तुमच्यासाठी असाच एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरून हसाल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

दुचाकी किंवा स्कूटी घेऊन रस्त्यावर निघताना नेहमी हे लक्षात ठेवा की हेल्मेट घालणं गरजेचं आहे. हेल्मेट हे पोलिसांनी दाखवण्यासाठी नाही तर आपल्या स्वत: च्या रक्षणासाठी आहे. त्यामुळे ते घेतलंच पाहिजे. पण असं असलं तरी देखील काही तरुण मंडळी या गोष्टींना गांभिऱ्याने घेत नाही आणि मग त्यांचं नुकान होणं सहाजिकच आहे. सोशल मीडियावर तुम्ही या संबंधीत अनेक व्हिडीओ पाहिले असतील. अनेकांना यामुळे चांगलीच अद्दल घडली आहे. अशाच एका विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल.

मुली काहीतरी हटके करायला गेल्या आणि तो जर त्यांचा प्रयत्न फसला तर नेटकरी मुलींची चांगलीच थट्टा करतात. पापा की परी म्हणून चिडवतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील मुलींनाही नोटकऱ्यांनी पापा की परी असं नाव दिलंय. त्याला कारणही तसंच आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन मुली स्कूटीवर आहेत, एक चालवत आहे तर दुसरी मागे उभी आहे. यावेळी रस्त्यावरुन बाईकवर काही तरुण येतात आणि यावेळी या तरुणी त्या तरुणाला हात दाखवतात. आणि याच नादात त्यांचा तोल जातो, बॅलन्स बिघडतो आणि त्या पडतात. या घटनेमुळे तरुणीला हाताला खर्चटलं आहे. पण तिला फारसं काही झालं नाही. यानंतर ती मुलगी उठते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तुम्हीही ट्रेनमध्ये मोबाईल चार्जींगला लावता? प्लॅटफॉर्मवर गाडी थांबताच ३ सेकंदात मोबाईल लंपास; प्रवाशांनो ‘हा’ VIDEO पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले असून नेटकऱ्यांनी या महिलांना चांगलाच ट्रोल केलं आहे. नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर देत आहेत. नेटिझन्स हसत आहेत आणि म्हणत आहेत की, आजकाल कधी काय होईल नी काय आपल्या समोर अचानक येईल याचा काही नेम नाही.