Viral Video: आजोबांचा आपल्या नातवंडांवर खूप जीव असतो, त्याप्रमाणे नातवांचादेखील आपल्या आजोबांवर जीव असतो. घरात आजी-आजोबा असले की, लहान मुलं आपल्या आई-बाबांपेक्षा आजी-आजोबांबरोबर जास्त वेळ घालवतात, ती त्यांच्याबरोबर खेळतात, फिरायला जातात. आजोबांनी शिकवलेल्या अनेक गोष्टी मुलांच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर असतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.
आजी-आजोबांचं प्रेम मिळण्यासाठी खूप नशीब लागतं. सध्या सोशल मीडियावर आजोबा अन् चिमुकल्या नातवाचा एक सुंदर व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही त्यांचं कौतुक कराल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घरामध्ये आजोबा ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’ हे अभंगावर आधारित भक्तिगीत गात टाळ वाजवत असून, त्यांचा नातू गाण्याच्या तालावर तबला वाजवताना दिसत आहे. या दोघांची मैफील चांगलीच रंगली असून, त्यांचा हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ @kaivalya_darade__official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्सदेखील करत आहेत. एकानं लिहिलंय, “खूपच मस्त बाळा”, तर दुसऱ्यानं लिहिलंय, “दोघांची जोडी मस्त”, तर आणखी एकानं लिहिलंय, “दोघंही मस्त, आणखी काय हवं”.