Heartwarming Grandmother And Grandson Bond Viral Video : आजी आणि नातवाचे नाते दूधावरच्या सायीसारखे असते. त्यातच माहेरी आणि सासरी दोन्हीकडे आजी असतील तर नातवासाठी ते स्वर्गसुख ठरते. दोन्ही पिढ्यांचा संघर्ष, दोघांचे वेगवेगळे विचार तरीही नातवाला आजीची तर आजीला नातवाची साथ मिळते. या नात्यामुळे आजीच्या आयुष्यातही पुन्हा एकदा सुखाचे क्षण येतात. त्यामुळे शरीराचे दुखणं विसरून ती पुन्हा एकदा नातवाला आपल्या लेकराप्रमाणे सांभाळताना दिसते. आज सोशल मीडियावर या नात्याचे आणखीन एक उदाहरण पाहायला मिळाले आहे.

लहान मुलांना एखादी नवीन खेळणे आणून दिले की, मुले कंटाळा येईपर्यंत, दिवसरात्र त्याच्याबरोबरच खेळत असतात. तर व्हायरल व्हिडीओत आजी तुळशीची पूजा करताना दिसते आहे. आजीच्या हातात घंटी आणि आरतीचे ताट आहे. तर नातू आजीला साथ देण्यासाठी खेळण्यातला, लहान मुलांचा ड्रम वाजवताना दिसतो आहे. नातू लहान असला तरीही चिमुकल्याचा ड्रम वाजवण्याची ताकद, त्याचा उत्साह अगदी बघण्याजोगा आहे जे पाहून आजीच्या चेहऱ्यावरही आनंद दिसतो आहे.

आजीच्या चेहऱ्यावरील आनंद बघा (Viral Video)

व्हायरल व्हिडीओतील चिमुकल्याचा नाव राघव आहे. राघव आजीला आरती करताना पाहून त्याचा खेळण्यातला वाजवायचा ड्रम घेऊन येतो आणि जोरजोरात वाजवण्यास सुरुवात करतो. आजीला ड्रम वाजवून दाखवण्याचा उत्साह, आपल्याला खूप छान वाजवता येतंय त्यांचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसतो आहे. एवढ्या छोट्याश्या चिमुकल्याचे टॅलेंट पाहून आजीच्या चेहरा सुद्धा खुलून आला आहे. आजी आणि नातूचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्ही बघाच…

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @aarav_unnikrishnan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून खुश झाले आहेत आणि “हा व्हिडीओला लाखात व्युव्हज गेले पाहिजेत”, “आजीच्या चेहऱ्यावरील आनंद बघा”, “राघव गोंडस… ढोलकी वाजवत असताना त्याच्या चेहऱ्यावर खूप उत्साह”, “चिमुकला खूप छान ड्रम वाजवतो”, “त्याचा पहिला कॉन्सर्ट त्याच्या आजीला समर्पित आहे” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत…