Friends Preparing Keḷavaṇ For Friend : घरातील एखाद्या जोडप्याचे लग्न ठरले की, हमखास केळवणाची आमंत्रणे त्यांना येऊ लागतात. यापूर्वी केवळ नवरीचे केळवण करण्याची पद्धत होती. पण, आता जोडप्याला लग्नाआधी घरी बोलावून त्याने अगदी थाटामाटात केळवण करण्यात येते. अगदी दारात रांगोळी काढण्यापासून ते केळीच्या पानात जेवण वाढण्यापर्यंत भरपूर तयारी केली जाते. आतापर्यंत तुम्ही हॉटेल, ट्रेन, कुटुंबातील सदस्यांबरोबर, खास मैत्रिणींनी केलेलं केळवण पहिले असेल. पण, आज असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये चक्क मित्रांनी केळवण केलं आहे.

मुलांची मैत्री, मुलींच्या मैत्रीपेक्षा थोडी आगळीवेगळीच असते असे म्हणतात. जिथे भांडणे कमी आणि मजा मस्ती जास्त असते. आज अशाच काही मित्रांनी मिळून त्यांच्या लाडक्या मित्राचे केळवण केलं आहे. खूप वर्ष वाट पाहून मित्राला त्याच्या आयुष्याची खास जोडीदार मिळाली आहे याचा आनंद साजरा करण्यासाठी सगळे मित्र एकत्र जमले आहेत. कोणत्याही मैत्रिणीची किंवा आई, बहिणीची मदत न घेता सगळ्या मित्रांनी स्वतःच्या मेहनतीने वेगवेगळे पदार्थ बनवले आहेत.

तुमची मैत्री अशीच कायम राहू द्या (Viral Video)

एक मित्र कांदा कापतोय, तर दुसरा मित्र लसूण सोलतो आहे. कोण बिर्याणी बनवण्यासाठी पनीरचे तुकडे तर कोण ग्रेव्ही बनवण्याच्या तयारीत आहे. एकेकीकडे स्वयंपाक घरात जेवणाची तयारी, तर दुसरीकडे काही मित्र केळवणाच्या सजावट करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यानंतर सगळी तयारी झाल्यावर मित्राला पाटावर बसवून केळीच्या पानात पंचपक्वान वाढून, ताटाभोवती फुलांच्या पाकळ्या ठेवून असे थाटामाटात केळवण साजरे केलं आहे. लाडक्या मित्राचे केळवण कसे करण्यात आले व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘भावाला बायको भेटली, त्याच खुशीत केळवण’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “बेस्ट केळवण”, “खूपच छान. बाळांनो…..आम्हा स्त्रीयांना पण लाजवेल असं केळवण केलं तुम्ही तुमच्या मित्राचं; ते सुद्धा स्वतः मेहनत घेऊन. यावरून कळतंय की, तुमच्यातील मैत्रीचा बॉंड किती घट्ट आहे आणि तुम्हाला सर्वांना एकच आशिर्वाद…. तुमची मैत्री अशीच कायम राहू द्या”, “मुलांनी इतकी मेहनत करून मित्रासाठी केळवण केले ते सुद्धा अगदी पंचपक्वान .खूपचं सुंदर छान वाटले व्हिडीओ बघून…” ; आदी वेगवेगळ्या भावना नेटकरी कमेंट्समध्ये व्यक्त करताना दिसत आहेत.