Viral Video: सोशल मीडियामुळे आपल्याला एका जागी बसून जगभरातील माहिती अगदी सहज मिळते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी ब्राझीलच्या रिओ ग्रांदे डो सुलममध्ये मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे पूर येऊन येथे भूस्खलनदेखील झाले. या पुरामुळे येथील हजारो लोकांना आपले घरदार सोडावे लागले. शिवाय यात अनेक जण जखमी, तर काहींचा मृत्यूदेखील झाला आहे. तसेच बरेच लोक अजूनही बेपत्तादेखील आहेत. अशातच या पुरातील एक हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एका व्यक्तीला पुरात अडकलेले त्याचे श्वान सापडल्याचे दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ दक्षिण ब्राझीलमधील असून पावसामुळे आलेल्या पुरामध्ये येथील अनेकांची घरं पाण्याखाली गेली. त्यावेळी येथील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. यात एका व्यक्तीचे काही श्वान पुरातच अडकले होते. त्यांना पुन्हा आणण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले, अखेर रेस्क्यू टीमच्या मदतीने त्याने त्याच्या श्वानांना सुरक्षितपणे पुरातून बाहेर काढले. यावेळी तो खूप भावूक झाला होता.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, श्वानांचा मालक त्याच्या श्वानांना सुरक्षित पुरातून बाहेर काढल्यानंतर त्यांना जवळ घेऊन कुरवाळत आहे. यावेळी त्याला अश्रूदेखील अनावर झाले होते.
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @goodnews_movement या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास आठ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून ५० हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्सदेखील कमेंट्स करत आहेत. यातील एका युजरने लिहिलंय की, “ही व्यक्ती टीमला माझी मुलं पुरात अडकली आहेत, त्यांना आणायचे आहे असं सांगत होता, टीमला श्वान अडकलेत असं सांगितल्यास कदाचित ते आले नसते, त्यामुळे त्याने रेस्क्यू टीमला माझी मुलं अडकली आहेत, असं सांगितले होते.”
तर आणखी एकाने लिहिलंय की, “याच्या श्वानांचेदेखील त्याच्यावर तेवढेच प्रेम आहे.” तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “त्याचा त्याच्या श्वानांवर खूप जीव आहे, म्हणूनच पुरात जाण्याचे धाडस त्याने दाखवले.”